BMC : मुंबई महानगरपालिकेचा ‘प्रसाद ते ऊर्जा’ अभिनव उपक्रम

लालबागच्या राजाच्या प्रसादातील ओल्या कचऱ्यापासून महानगरपालिका रुग्णालयांना वीज


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गणेशोत्सवातील कचऱ्याचे शाश्वत व शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयाने अभिनव ‘प्रसाद ते ऊर्जा’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मंडळाच्या प्रसाद कक्ष व अन्नछत्रामधून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर बायोमिथेनेशन प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत मंडळाच्या प्रसाद वितरण आणि भोजन सुविधांमधून दररोज सुमारे ८ ते १० मेट्रिक टन शुध्द अन्न व जैविक कचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. या कचऱ्याचे निर्मितीस्थळी योग्य विलगीकरण करून, समर्पित वाहनांद्वारे तो महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जीटीबी रुग्णालय आणि शीव रुग्णालय येथील बायोमिथेनेशन प्रकल्पांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. (Mumbai news)


महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जीटीबी रुग्णालय आणि शीव रुग्णालय येथील बायोमिथेनेशन प्रकल्पांतील प्रत्येक प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता सुमारे २ मेट्रिक टन प्रतिदिन आहे. या उपक्रमांतर्गत ११ दिवसांत सुमारे ८० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून अंदाजे ७ हजार ७४४ युनिट नवीकरणीय वीज निर्माण करण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्ष वीज निर्मिती ही विलगीकृत कचऱ्याचे प्रमाण व गुणवत्ता तसेच प्रकल्पांच्या कार्यस्थितीवर अवलंबून राहील. (BMC)



निर्माण होणारी वीज रुग्णालयांतील रुग्ण कक्ष, मार्गिका आणि अन्य सामायिक परिसरातील प्रकाशव्यवस्थेसह योग्य कामांसाठी वापरण्यात येणार आहे. हा उपक्रम उप आयुक्त (परिमंडळ-२) आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या निर्देशानुसार तसेच एफ/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेने नियुक्त केलेली एरोकेअर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था या प्रकल्पांचे परिचालन व देखभाल करीत आहे. मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण आणि शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त ऊर्जा निर्माण करता येते, हे या उपक्रमातून अधोरेखित होणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक कचरा विल्हेवाट व्यवस्थेवरील भार कमी होऊन चक्रीय अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेलाही चालना मिळणार

Comments
Add Comment

Mumbai Crime : 4 जणांनी विमानातून आणले कोट्यवधींचे सोने, पण एक चूक अन्... मुंबई विमानतळावर कस्टमची सर्वात मोठी कारवाई!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विदेशी सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा महसूल

KEM Hospital Mumbai : केईएम रुग्णालय आगीपासून अधिक सुरक्षित

फायरप्रुफ बनवण्यासाठी तब्बल साडेदहा कोटींचा केला जाणार खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी): मागील कालावधीत अहमदनगर

Mumbai Metro : गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रो सज्ज; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत वाढीव सेवा उपलब्ध

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वनने प्रवाशांसाठी विशेष सुविधा जाहीर केली आहे.

Ganeshotsav : मूर्तिच्या आकारापेक्षा भक्ती महत्वाची

गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा अखिल सार्वजनिक गणेशोत्सव मंहासंघाचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डी. जे ला

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; ३८६ गणपती विशेष गाड्या जाहीर, कोकणासाठी ४ अतिरिक्त गाड्यांची भर

मुंबई :

Mumbai Water Update: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! भातसा तलावात ९७.४० टक्के पाणीसाठा, सध्याची परिस्थिती काय?

मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख