अखेर मान्सून केरळात दाखल

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मान्सून) तब्बल सात दिवस उशिराने, पण केरळात आगमन झाले आहे. मान्सूनने दक्षिण तामिळनाडू आणि केरळचा बराचसा भाग गुरुवारी (ता. ८) व्यापला आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी जाहीर केले.


देशात मान्सूनच्या पुढील वाटचालीस आता सुरुवात झाली आहे. सध्या मान्सूनने केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तामिळनाडू, दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप बेटे, ईशान्य आणि मध्य बंगालच्या उपसागराचा भाग व्यापले आहे.


दरम्यान पुढील ४८ तासात संपूर्ण केरळसह तामिळनाडू, कर्नाटक, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागात मान्सून प्रगती करेल. असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.


साधारणपणे मान्सून १ जूनपर्यंत (दीर्घकालीन आगमनाच्या वेळेनुसार) केरळमध्ये दाखल होतो. मात्र त्यास विलंब झाला असून प्रत्यक्षात गुरुवारी (ता. ८) केरळमध्ये मान्सूनने आगमन केले आहे. त्यामुळे यंदा मान्सूनने ७ दिवस उशिराने देशाच्या भूभागात केरळमध्ये प्रगती केली. या आधी २०१९ मध्ये ही ८ जूनला मान्सून केरळात पोहोचले होते.


पुढील दोन दिवसात संपूर्ण केरळ व्यापण्याची शक्यता असून मध्य अरबी समुद्र, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटक आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात तसेच ईशान्येकडील राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

MRPL Blast Mangaluru : मंगळुरूमधील MRPL प्लांटमध्ये भीषण स्फोट ! एकाचा मृत्यू, 9 जण जखमी

MRPL Blast Mangaluru : कर्नाटकातील मंगळुरू येथील जोकाट्टे परिसरातील मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL)

Captain Smit Machchhar : भारतीय पायलट स्मित मछार ठरले 'रिअल हिरो'; ट्रम्प व नेतान्याहू यांनी केले कौतुक

पंतप्रधान मोदींकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात हवेतच घडलेल्या धक्कादायक

बीएसएनएल 27 वा स्थापना दिन साजरा करणार; दूरसंचार क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळाची यशस्वी वाटचाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी

Rabi MSP 2026 : रब्बी पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ; केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अधिक लाभदायक भाव मिळावा आणि रब्बी हंगामातील पिकांच्या

Anamika Mishra: वय अवघं 7 वर्ष; लक्ष्य 30 किलोमीटर! अनामिकाच्या धाडसी आव्हानाची चर्चा

नवी दिल्ली: 'मुर्ती लहान पण किर्ती महान' ही म्हण आपण ऐकली असेल. या म्हणीचा प्रत्यय सहसा आपल्याला लवकर येत नाही. पण या