Death of Cheetah : कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू

११ महिन्यांमध्ये नऊ चित्ते मृत


श्योपुर : देशात चित्त्यांची संख्या घटत असल्याने राबवण्यात आलेल्या 'प्रोजेक्ट चित्ता'मधील (Project Cheetah) आणखी मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातील (Kuno National Park) मरण पावलेला हा नववा चित्ता होता. मध्य प्रदेश वनविभागानं म्हटलं आहे की, कुनोतील मादी चित्त्यांपैकी एक चित्ता धात्री (Dhatri) आज सकाळी मृतावस्थेत आढळून आली आहे. मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी चित्त्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जात आहे.


कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता पुनरुज्जीवनासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते आणण्यात आले होते. मात्र आतापर्यंत एकूण ९ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा चित्ते आणि कुनो येथे जन्मलेल्या तीन बछड्यांचा समावेश आहे. आज मरण पावलेली चित्ता मार्च महिन्यापासून मरण पावलेली सहावी प्रौढ चित्ता आहे. १४ चित्ते कुनोच्या आवारात ठेवण्यात आले आहेत, ज्यामध्ये सात नर, सहा मादी आणि एक मादी बछडा यांचा समावेश आहे.


दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 'तेजस' या नर चित्ताचाही ११ जुलै रोजी मृत्यू झाला होता. कुनो पार्क व्यवस्थापनाच्या निरीक्षणादरम्यान हा चित्ता जखमी अवस्थेत आढळून आला. तेजसच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसत होत्या. चित्त्यांच्या मृत्यूबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या सुनावणीत खंडपीठाने चिंता व्यक्त केली होती. केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणं योग्य होणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. इतर अभयारण्यातही त्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असं ते म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा