Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५) यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतकाचा ड्रायव्हर रवि पंडित उर्फ रवि किशन तिवारी याने आपल्या मालकाचा विश्वासघात करत हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. (Dhirendra Pratap Singh Murder Case)


पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी धीरेंद्र प्रताप सिंह यांना चालत्या गाडीतच नशेचा पदार्थ हुंगवून बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. हत्या केल्यानंतर मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून आरोपी फरार झाले. तसेच धीरेंद्र सिंह यांची फॉर्च्युनर गाडी मेदांता हॉस्पिटलजवळ सोडण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. (Dhirendra Pratap Singh Murder Case)



१० वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम :


पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकरणात चार संशयितांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी ड्रायव्हर रवि किशन तिवारी आणि त्याचा साथीदार ओमकार यांना ताब्यात घेतले आहे, तर अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. रवि हा मागील सुमारे १० वर्षांपासून धीरेंद्र प्रताप सिंह यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्यांचा विश्वासू मानला जात होता. याच विश्वासाचा फायदा घेत त्याला कथितरित्या मोठ्या रकमेची सुपारी आणि आयुष्य ‘सेटल’ करण्याचे आमिष दाखवून हत्येच्या कटात सहभागी करून घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून आता ड्रायव्हरला हत्येसाठी किती रक्कम देण्याचे ठरले होते, याचा तपास सुरू आहे. (Dhirendra Pratap Singh Murder Case)



दोन्ही गनरही पोलिसांच्या रडारवर :


धीरेंद्र प्रताप सिंह यांच्या सुरक्षेसाठी दोन गनर तैनात होते. त्यापैकी एक गनर शनिवारी आजारी असल्यामुळे ड्युटीवर आला नव्हता. तर दुसऱ्या गनरलाही कटाचा भाग म्हणून ड्युटीवर येऊ नको, असे ड्रायव्हरने सांगितल्याचा आरोप आहे. दोन्ही गनर उन्नाव पोलिसांकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. ते ड्युटीवर का आले नाहीत आणि त्यांना ड्युटीवर येण्यापासून कोणी रोखले, याबाबत त्यांची चौकशी केली जाणार आहे. (Dhirendra Pratap Singh Murder Case)



पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी मोबाइल ट्रेनमध्ये ठेवला :


तपासादरम्यान आरोपींनी पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी धीरेंद्र सिंह यांचा एक मोबाइल फोन ट्रेनमध्ये ठेवला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोबाइलची लोकेशन सतत बदलत राहावी आणि तपास यंत्रणेला चुकीचा माग मिळावा, असा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. मोबाइल लोकेशन तपासल्यानंतर सुरुवातीला गोसाईगंज, हैदरगढ आणि अमेठीतील जगदीशपूर परिसरात लोकेशन मिळाली. त्यानंतर मोबाइलची शेवटची लोकेशन चंदौली येथे आढळली. (Dhirendra Pratap Singh Murder Case)



जमीन वादातून हत्येचा कट?


पोलिसांच्या तपासात या हत्येमागे जमिनीचा वाद असल्याची माहिती समोर आली आहे. उन्नाव जिल्ह्यातील एका तहसीलमधील मालमत्तेच्या वादासंदर्भात धीरेंद्र प्रताप सिंह यांनी एसडीएमकडे दुसऱ्या पक्षाविरोधात तक्रार केली होती. संबंधित जमिनीवर कब्जा करण्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर निर्माण झालेला वाद वाढला आणि त्यातूनच हत्येचा कट रचण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (Dhirendra Pratap Singh Murder Case)



एसटीएफकडूनही तपास सुरू :


या हत्याकांडाच्या तपासात आता एसटीएफची टीमही सहभागी झाली आहे. लखनऊ पोलिसांच्या दक्षिण विभागासोबत एसटीएफकडून तपास केला जात आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी करून हत्येची संपूर्ण योजना, सुपारीची रक्कम आणि इतर आरोपींची भूमिका याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लखनऊ पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी सहा पथके तैनात केली आहेत. घटनेत वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे. (Dhirendra Pratap Singh Murder Case)

Comments
Add Comment

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार

एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरजवळ गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.