Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. भरधाव ट्रेलरने नियंत्रण गमावून डिव्हायडर तोडत विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये प्रवेश केला आणि समोरून येणाऱ्या बलेनो कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील चारही प्रवाशांचा मृत्यू झाला. (Greater Noida Accident)


पोलिसांच्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजता जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना एक्सप्रेसवेवरील 36 किलोमीटर दूर हा अपघात झाला. डायल 112 वरून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जेवर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.



ग्रेटर नोएडाचे डीसीपी रवी शंकर नीम यांनी सांगितले की, बलेनो कारमधून चार जण मथुराहून नोएडाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी नोएडाकडून आग्राच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरने अचानक नियंत्रण गमावले. ट्रेलरने रस्त्याच्या मधील दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये प्रवेश केला आणि बलेनोला धडक दिली. (Yamuna Expressway Accident)


धडक एवढी जोरदार होती की कारचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. चारही प्रवासी वाहनात अडकले होते. पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून कारचे तुटलेले भाग बाजूला करत प्रवाशांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर चौघांनाही मृत घोषित केले. ( Noida Police)


अपघातामुळे यमुना एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस आणि बचाव पथकांनी अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला मलबा हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.


मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ट्रेलर आणि चालक पोलिसांच्या ताब्यात असून ट्रेलरचे नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास केला जात आहे. ( Uttar Pradesh News)


Comments
Add Comment

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार

एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरजवळ गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.