मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा 'रानकवी' हरपला

कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाने पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : "ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं 'रानकवी' होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां'नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली.


मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी' सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते 'वनश्री' पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराचे मानकरी ठरले होते.


शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधीमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nitesh Rane News: महाराष्ट्राच्या 877 किमी किनारपट्टीचा एकात्मिक विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मुंबई: महाराष्ट्राची ८७७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी, बंदरांचे विस्तृत जाळे आणि मजबूत औद्योगिक व उत्पादन

'भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र'ला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट

मुंबई: मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बातमी आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या पुर्वसंध्येला केंद्र

शेगावहून देवीची मूर्ती घेऊन जाताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा

FDA ने CIPLA फार्मा कंपनीला दिला दणका, गोदामातील औषध विक्री परवानेच केले रद्द

पुणे: अन्न- औषध प्रशासनाने औषधांची सुरक्षितता, गुणवत्ता, योग्य साठवणूक तसेच औषध विक्री आणि वितरणातील वैधानिक

दिवेआगारातील त्या घटनेनंतर आळंदीतील विनर्स अकादमीला फटका, परवाना केला रद्द; कारण की....

११ वी आणि १२ वी इयत्तेत शिकत असलेल्या८ अल्पवयीन मुलांचा दिवेआगर येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदी

Mahendra Harpalkar : ‘एमपीएससी’चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चेनंतर फडणवीस सरकारची कार्यवाही

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या