मुंबई : अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या (3 ऑक्टोबर) पूर्वसंध्येला जगभरातील मराठी भाषिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. ...
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय की, "लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी... मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' (Centre of Excellence for Studies in Classical Marathi) स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली असून, पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' स्थापन करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम राज्य सरकारने आधीच हाती घेतले होते. तो केंद्राकडे सादर करुन आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार आहे. 'अभिजात मराठी भाषा दिना'च्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आम्हा सर्व नागरिकांना अत्यानंद होतो आहे. महाराष्ट्र, देश आणि जगभरातील मराठीजनांसाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे. या निर्णयाबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो." पोस्टच्या शेवटी #मराठी असं लिहिलं आहे.
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज इन क्लासिकल मराठी) स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता.
मला हे… pic.twitter.com/W5zONMuqXB
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 2, 2026
दरम्यान, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 4 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' (Classical Language) दर्जा बहाल केला होता. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयाचाच पुढील टप्पा म्हणून आता पुण्यात या उत्कृष्ट केंद्राची स्थापना केली जात आहे. या महत्त्वाच्या केंद्राच्या उभारणीमुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, संशोधनासाठी आणि विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी उपलब्ध होणार आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने, मराठीसह आसामी, बंगाली, पाली आणि प्राक्रित या भाषांसाठीही 'भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे.
मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवार, दिना ...