वेंगुर्ले येथे पाकिस्तानी नागरिकाच्या नावावर तब्बल ८५ गुंठे जमीन

‘शत्रू मालमत्ता' शासनाने घेतली ताब्यात; त्या जमिनीभोवती तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया सुरू

वेंगुर्ला : पाकिस्तानचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकांच्या भारतामधील मालमत्ता ताब्यात घेऊन विक्रीची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. अशा मालमत्तांना 'शत्रू मालमत्ता' (एनिमी प्रॉपर्टी) असे म्हटले जाते. पाकिस्तानी नागरिकाच्या नावावर असलेली अशी मालमत्ता सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात आढळली आहे. ८५ गुंठे जागा असलेल्या या मालमत्तेची मोजणी करून शासनाने ती आपल्या ताब्यात घेतली आहे. तेथे आता तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याला वेंगुर्लेचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दुजोरा दिला आहे.


मूळ भारतीय रहिवासी असलेल्या भारतातील काही नागरिकांनी पाकिस्तान मध्ये गेल्यावर तेथील नागरिकत्व स्वीकारले आहे. अशांच्या भारतात मालमत्ता आहेत. या मालमत्तांमधून त्यांना बेदखल करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. शत्रू देशांचे नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करतानाच त्यांची मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे.



महाराष्ट्रात अशा २०८ मालमत्ता


महाराष्ट्रात अशा २०८ मालमत्ता असून यात सिंधुदुर्गाचाही समावेश आहे. पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या एका व्यक्तीची वेंगुर्ले तालुक्यात मालमत्ता आहे. ही अंदाजे ८५ गुंठे जागा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील या शत्रू मालमत्तेची शासनाला माहिती मिळताच त्यांनी त्या जमिनीबाबत कागदोपत्री तपासणी केल्यानंतर ती जमीन मयेकर नामक एका व्यक्तीच्या नावे असल्याचे दिसून आले. त्या जमिनीवर आंबा आणि काजू कलमांची लागवड आहे. महसूल विभागाकडून त्या जमिनीची पाहाणी व मोजणी केल्यावर शासनाने ती आपल्या ताब्यात घेतली आहे. तसेच त्या जमिनीवरील झाडांचा लिलाव ही करण्यात आला आहे.


आता मालमत्तेच्या भोवती स्थानिक विकासनिधीतून तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाने ही जमीन ताब्यात घेतल्यानंतर जमिनीच्या सातबाऱ्यावर भारत सरकारचे नाव आले आहे.


त्यामुळे सद्यस्थितीत जमीन नावावर असलेल्या मयेकर कुटुंबीयांनी आपला यात दोष नसल्याचे सांगत न्याय मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.