Rahul Gandhi : ‘सोनियाजी, 'या रोडरोमिओ'चे लग्न करा, मां का लाडला बिगड गया’

राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका


मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) ‘फ्लाइंग किस’चा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या कृतीविरोधात महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही राहुल गांधींवर सडकून टीका केली. त्यांनी राहुल यांना 'रोडरोमिओ' संबोधून 'मां का लाडला बिगड गया', अशी टीका केली.


चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या आहेत की, संसदेच्या पवित्र भूमीवर राहुल गांधींनी फ्लाइंग किस केल्याची कृती ही निंदणीय आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने असे वर्तन करणे हे अशोभणीय आहे. चौकीदार चोर आहे, या त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना कोर्टात लिखित स्वरुपात माफी मागावी लागली होती. अलीकडेच मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांची खासदारकी रद्द झाली होती. खासदारकी त्यांना परत मिळाली. मात्र राहुलजींची वृत्ती बदलली नाही.





चित्रा वाघ म्हणाल्या, आज संसदेत मणिपूरच्या महिलांना न्याय आणि आदर देण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर त्यांनी केलेली कृती महिला विरोधी आहे. काँग्रेस नेते महिलांच्या सन्मानाची गोष्ट केवळ आपल्या भाषणातच करतात. त्यांची वृत्ती महिला विरोधी आहे, हे आज दिसले. असे रोडरोमिओ भारत जोडो यात्रा काढत आहेत. काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. देशातील सर्वोच्च पदावर बसण्याची स्वप्न पाहात आहेत. मात्र, जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे वाघ म्हणाल्या.


यावेळी त्यांनी सोनिया गांधींना निवेदन केले. त्या म्हणाल्या, सोनियाजी, लवकरात लवकर राहुल यांचे लग्न करा. त्याचे मानसिक संतुलन बिघडलेय. मा का लाडला बिगड गया, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात