कोकणी माणसा जागा हो! जमिनी बाहेरच्यांना विकू नका!

महाराष्ट्र सैनिकांनाही दक्ष राहण्याचे आवाहन


पनवेल : मुंबई गोवा महामार्ग झाल्यावर पण महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवा की कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे बघा. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाचं इतकं अद्भुत दान आपल्या पदरात पडलं आहे त्याचा नाश करू देऊ नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे.


कोकणामध्ये अनेक उत्तर भारतीय जमीनी विकत घेत आहेत. या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेताना त्यांनी भाजपाचे गोव्याचे मुख्यमंत्री आपल्याला गोव्याचा गुडगाव करायचा नाही असे म्हणाले असल्याचे सांगतात. जसे त्यांच्याकडे शेतजमीन शेतीसाठीच विकली जाते तशी स्थिती महाराष्ट्रात का नाही? असा सवालही राज यांनी विचारला आहे.


राज ठाकरे आज पनवेलमध्ये पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करण्याकरिता आले असता त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून सरकारला खडे बोल सुनावले.


रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सुमारे अडीज हजार लोकांचे जीव गेले असल्याचे म्हटले आहे. कोकणात जमिनीचे व्यवहार कोणासाठी आणि कशासाठी होत आहेत? याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. यावेळी कुंपण शेत खातंय… असा आरोपही त्यांनी केला.

Comments
Add Comment

Neena Gupta: वयाच्या 67 व्या वर्षी नीना गुप्ता प्रेग्नेंट? संतापलेवल्या अभिनेत्रीने जरा स्पष्टच सांगितलं

मुंबई: अभिनेत्री नीना गुप्ता ह्या बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. रोखठोक व्यक्तिमत्व आणि स्पष्ट बोलणं

Hartalika Teej 2026 : हरतालिका तृतीया पूजा साहित्य: घरातच पूजनाची तयारी करताय? 'या' वस्तू आणायला अजिबात विसरू नका!

हरतालिका तृतीया हा अखंड सौभाग्य आणि पतीच्या उदंड आयुष्यासाठी मानला जाणारा अत्यंत पवित्र

Mumbai Pune Expressway: जादुई नंबरप्लेट लावणं भोवलं, फॉर्च्यूनर ड्रायव्हरला RTO चा दणका

पिंपरी चिंचवड: अलीकडेच सोशल मीडियावर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर टेक्नॉलॉजी वापरून आरटीओ पोलिसांच्या

Railway Megablock News: ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांचा खोळंबा, रविवारी 'या' मार्गावर ९ तासांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेसही रद्द

पुणे: गणेशोत्सवासाठी जेमतेम काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नोकरदारवर्ग आता गणेशोत्सवासाठी आपल्या गावी

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Ganeshotsav Decoration 2026: वांद्रे येथे साकारलेय प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती, भव्य दिव्य देखाव्याने जिंकले मन

मुंबई: मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे दरवर्षी ऐतिहासिक आणि आकर्षक मंदिरांची प्रतिकृती साकरतात.