Nashik Crime News : स्वतःचे पैसे परत मागणे एका ५६ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटला चांगलेच महागात पडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. आर्थिक ...
रविवारी पुणे रेल्वे स्थानकावर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल, एक्स्प्रेस आणि मेमू गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी रविवार असल्यामुळे त्या दिवशी अनेक जण घराच्या बाहेर शॉपिंग करण्यासाठी निघतात. त्यामुळे जे शॉपिंग करण्यासाठी, गावी जाण्यासाठी घराबाहेर निघणार आहेत, त्यांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. नऊ तासांच्या मेगाब्लॉकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकल, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस आणि मेमू गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.
का घेण्यात आला मेगाब्लॉक?
पुणे- दौंड विभागातील पुणे यार्डामध्ये डी.डी.एस. पॉइंट क्रमांक २२८ (आय) आणि २२६ (थ्री) बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासोबतच सध्या अस्तित्वात असलेल्या ५२ किलो वजनाच्या रेल्वे मार्गाचे ६० किलो वजनाच्या मार्गात उन्नतीकरण करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या कामासाठी विशेष वाहतूक तसेच वीज ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. ब्लॉकच्या कालावधीत पुणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १, अप मेन लाइन आणि सीएसएमटीकडील डाउन मेन लाइनवरील रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे लोकल, एक्स्प्रेस आणि मेमू गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Nashik : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण अर्थात एसआरआर मोहिमेत नाशिक जिल्ह्यात तब्बल १० लाख २७ हजार ८९४ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली ...
कोणत्या एक्स्प्रेस रद्द होणार?
पुणे-तळेगाव- रद्द
तळेगाव-पुणे- रद्द
पुणे-लोणावळा- रद्द
लोणावळा-शिवाजीनगर लोकल- रद्द
सीएसएमटी-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस- रद्द
पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस- रद्द
पुणे-दौंड मेमू ट्रेन- रद्द
कोणत्या गाड्यांच्या शेवटच्या स्थानकामध्ये बदल केला?
जयपूर-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, मुंबई-पुणे एक्स्प्रेससह काही गाड्या खडकी किंवा हडपसर स्थानकांपर्यंतच चालवण्यात येणार आहे. लोणावळा-पुणे लोकल शिवाजीनगरपर्यंत, बारामती- पुणे मेमू ट्रेन दौंडपर्यंत, पुणे-लोणावळा लोकल शिवाजीनगरपर्यंत, पुणे-जयपूर, पुणे- नागपूर आणि पुणे- मुंबई एक्स्प्रेस खडकी किंवा हडपसर स्थानकांपर्यंतच चालवल्या जाणार आहे. प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून प्रवाशांना करण्यात आलं आहे.