Sharad Pawar Photos : 'माझा फोटो वापराल तर कोर्टात खेचेन', इशार्‍यानंतर अजित पवार गटाच्या बॅनर्सवरील शरद पवारांचे फोटो गायब!

छगन भुजबळांनी लगावला टोला


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (NCP) बाहेर पडत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले असतानाही आम्ही एकच पक्ष आहोत, असे वारंवार अजित पवारांच्या गटाकडून सांगण्यात आले. या फुटीनंतर अजित पवार गटाने शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेऊन एकत्र येऊन काम करु, अशी गळही घातली. जे बॅनर्स अजित पवारांच्या गटाने लावले त्यावरदेखील शरद पवारांचा फोटो वापरण्यात आला. अजित पवार गटाकडून कोणतीही फूट किंवा मतभेद नसून शरद पवार कायम आमच्यासाठी आदर्श राहतील, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी शरद पवार मात्र ही गोष्ट जुमानत नाहीत.


फुटीच्या घटनेला दीड महिना उलटल्यानंतरही अजित पवार गटाकडून बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो वापरण्यात येत होता. आता मात्र हा फोटो न वापरण्यासंदर्भात अजितदादा गटाच्या वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचे समजत आहे. याचे कारण म्हणजे 'फोटो वापराल तर कोर्टात खेचेन' असा इशाराच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला आहे. त्यामुळे अजित पवार गट सतर्क झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर किंवा इतरत्र कोठे न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.



छगन भुजबळांचा शरद पवारांना टोला


शरद पवारांनी फोटो वापरल्यास कोर्टात जाण्याची ताकीद दिल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांना टोला लगावला होता. आतापर्यंत फोटोचा अवमान झाला किंवा अनादर झाला म्हणून कोर्टात गेल्याच्या घटना पाहिल्या होत्या. परंतु आदराने आपला फोटो लावला म्हणून कुणी कोर्टात गेले, असे उदाहरण मी पाहिलेले नाही असा टोला मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांना लगावला.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता