Manoj Jarange : लाठीचार्ज प्रकरणात न्याय दिला जाईल; मनोज जरांगेंशी देवेंद्र फडणवीस यांचा फोनवरुन संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आंदोलनकर्त्यांशी साधणार संवाद


मुंबई : जालना येथे मराठा समाजाच्या लोकांनी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनावर (Jalna Maratha Andolan) पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा प्रश्न फारच चिघळला आहे. राज्यभरात याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको, तर काही ठिकाणी गाड्यांची जाळपोळ करुन निषेध दर्शवला जात आहे. यामुळे एसटीच्याही अनेक ठिकाणी फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी त्यांना चर्चेचा प्रस्ताव दिला. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील आज जालन्यात जाऊन आंदोलकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.


काल बुलढाणा येथे झालेल्या 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे यावर तातडीने पावले उचलत ते आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, फडणवीसांनी जरांगे यांना जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणात न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर लवकरच मराठा आंदोलनाच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येईल, असंही सरकारनं म्हटलं आहे.


या पार्श्वभूमीवर आज दुपारी मराठा आरक्षणविषयक कॅबिनेटच्या उपसमितीची बैठक पार पडणार असून यामध्ये आरक्षणासंबंधी चर्चा होईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, अजित पवार हे तीन दिवसांपासून कोणत्याही जाहीर सभेत सहभागी झालेले दिसले नाहीत. कालच्या कार्यक्रमातही आजारी असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज सलग तिसऱ्या दिवशी देखील अजितदादांचे सगळे कार्यक्रम राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार का, हा प्रश्न आहे.



मनोज जरांगे यांचं आंदोलन आणखी तीव्र


उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. मात्र आजपासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका घेत त्यांनी आपलं उपोषण आणखी तीव्र केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, आम्ही सरकारचं ऐकतोय, प्रतिसाद देतोय, डॉक्टरांचंही ऐकतोय. सरकारने आज निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही. मी आता तसं बोलण्याच्या मूडमध्ये नाही. सरकार शंभर टक्के प्रयत्न करतंय, बैठका घेत आहे. मी आणि माझा समाज सरकारला, डॉक्टरांना प्रतिसाद देणार आहे. शंभर टक्के निकाल लागेल. आज आम्हाला न्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा