Goa Bus accident : नियंत्रण सुटलं आणि चालक जागीच ठार... गोव्यात बसचा भीषण अपघात!

पणजीहून हैदराबादला निघाली होती बस


पणजी : गोव्यात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने एका खाजगी बसचा भीषण अपघात (Goa Bus accident) झाला आहे. यात चालक जागीच ठार झाला असून इतर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पणजीहून (Panaji) हैदराबादच्या (Hyderabad) दिशेने निघाली होती. दरम्यान धारबांदोडा येथे या बसला अपघात झाला. या अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


हैदराबादला निघालेली ही बस रस्त्याच्या एका वळणावर आली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडली आणि अपघात झाला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेत काढले. यावेळेला या बसमध्ये २३ प्रवासी आणि तीन चालक प्रवास करत होते. बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन चालक आणि २३ प्रवासी जखमी झाले आहेत, पैकी ९ जणांची अवस्था गंभीर आहे.


पणजीतील बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये वामशी मुशरी (वय २३), श्‍वेता गदाम (वय २२), लिप्पस्वामी पिल्लई (वय २६), अर्चना व्ही (वय २५), आशिश सिरना (वय २१), साईच्छा लाडमतिनी (वय २५), शिवलिंग स्वामी, नितीन सोमण (वय २१), सौम्या कोटार (वय २४) आणि शिवराम रेड्डी (वय ४०) यांचा समावेश आहे. इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर