केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कै. वामन दादांना मरणोत्तर डी.लिट पदवी प्रदान

प्रमोद दंडगव्हाळ


सिडको : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, नाशिकचे भूषण, प्रसिद्ध कवी, गीतकार आणि शाहीर कै. वामनदादा कर्डक यांना मराठवाड्यातील एमजीएम विद्यापीठाने मरणोत्तर डी.लीट पदवी प्रदान केल्याने नाशिककरांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कै. वामन दादांना मरणोत्तर डी.लिट पदवी संभाजी नगर येथे मोठ्या समारंभात ही पदवी बहाल करण्यात आली.


याप्रसंगी वामनदादा कर्डक यांचे सुपुत्र व युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आयु. रविंद्र वामन कर्डक, कु. कोमल कर्डक, आयु. मधुकर कर्डक, आयु. अशोक नवतुरे, आयु. राजानंद नवतुरे आदी मान्यवर उपस्थित होते.


देशवंडी, तालुका सिन्नर येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी जन्मलेले वामनदादा कर्डक यांची जन्मशताब्दी २०२२ मध्ये झाली. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना मरणोत्तर मानाचा सन्मान मिळत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही आनंदाचीच बाब म्हणावी लागेल. शिक्षणाचा गंधही नसलेले वामनदादा कर्डक यांनी सुरुवातीच्या काळात अनेक हालअपेष्टा भोगल्या. नोकरीच्या निमित्ताने मुंबईत त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. अनेक नोकऱ्या केल्या. परंतु कशातच त्यांचे मन रमले नाही. साधी अक्षर ओळख नसतानाही नंतर बाराखडी व जोडाक्षरे शिकून त्यांनी साहित्यिक क्षेत्रात जे नाव कमावले. त्याला निश्चितच तोड नाही.


आंबेडकरी विचार हा त्यांचा श्वास होता. आपल्या ओजस्वी वाणीतून आणि दमदार लिखाणाद्वारे त्यांनी भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविले. त्यांच्या गीतांचा संपूर्ण महाराष्ट्र दिवाना होता. ते अशिक्षित असले तरी त्यांनी १० हजाराहून अधिक गीते लिहिली. विशेष म्हणजे ती सर्वत्र लोकप्रिय झाली. त्यांच्या साहित्यांवर अनेकांनी पीएचडी करून विद्यावाचस्पती होण्याचा बहुमान मिळवला यातच सारं काही आलं.


दादांना पंधराहून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. १९८५ साली त्यांनी नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. चल ग हरणे तुरु तुरु.., ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा..' ही त्यांनी लिहिलेली गाणी अजरामर झाली.


वामनदादा कर्डक यांच्यासारख्या व्यक्तीला मरणोत्तर डी.लीट पदवी जाहीर केली. हा त्यांच्या कार्याचा एक प्रकारे गौरवच म्हणावा लागेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १ हजार ८०० कोटींचा निधी

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) कामांसाठी राज्य सरकारने गुरुवारी १

Nashik : 'इको बाप्पा’चा नाशिकमध्ये विक्रम; ४० हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Nashik : विकासाची गती कायम ठेवतानाच पर्यावरणाचे संवर्धन करून भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ व शाश्वत नाशिक घडविणे, हाच

Nashik Crime : वृद्ध माजी अधिकारी दर्शनासाठी नाशिकला आली अन् भलतंच घडलं, ३१ लाखांचे साेने लंपास

Nashik : नाशिक हे सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे, त्यामुळे साहजिकच अनेक भाविक, पर्यटक याठिकाणी मोठ्या

Nashik : सप्तशृंगीगड रस्ता बंदीला अखेर दिलासा, 'या' दिवशी मार्ग राहणार खुला

Nashik : रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटरस्ता (Saptashrungigad to Nanduri Ghat Road) तब्बल १६ दिवस पूर्णपणे बंद

Nashik : ‘Gen Z’ नव्हे, ‘Green Generation’ बना , गिरीश महाजन यांचे आवाहन ; मिशन ग्रीन मॉन्सून द्वारे साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Nashik : आजचा काळ ‘Gen Z’ युवकांचा आहे. त्यांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आणि इन्स्टाग्रामसारखी आधुनिक साधने आहेत; मात्र

Simhastha Mahakumbh Mela 2027: ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’च्या नोंदणीला मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

Simhastha Mahakumbh Mela 2027 : ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’त (‘Simhastha Mahakumbh’ Ganesh Mandal Competition) नाव नोंदवू इच्छिणाऱ्या मंडळांसाठी