Nashik : नाशिक हे सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे, त्यामुळे साहजिकच अनेक भाविक, पर्यटक याठिकाणी मोठ्या संख्येने भेटी देत असतात. अशाच प्रकारे तिर्थाटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या मुंबईतील एका ८३ वर्षीय सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्यासोबत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुक्कामासाठी हॉटेलमध्ये थांबलेल्या ८३ वर्षीय सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याचे ३८ ताेळे सोन्याचे दागिने हॉटेलमधून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Nashik Crime News)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग आला ...
नेमकं काय घडलं ?
महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) कृषी खात्यातून निवृत्त झालेल्या आणि मुंबईतील (Mumbai) कांदिवली पूर्व येथील रहिवासी असलेल्या शोभा पंढरीनाथ सोनवणे ( वय ८३ ) या १४ जुलै २०२६ रोजी नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आल्या होत्या. याठिकाणी मुक्कामासाठी त्या शरणपूर रोडवरील ‘हॉटेल सिटी प्राइड’ येथे मुक्कामी थांबल्या. वयोवृद्ध असल्याने त्यांनी दैनंदिन कामात मदतीसाठी हॉटेल मॅनेजरकडे केअर टेकरची मागणी केली. त्यानुसार हॉटेल मॅनेजरने एका केअर टेकरची दररोज ५०० रुपये मानधनावर नियुक्ती करून दिली. (Nashik Crime News)
दरम्यान, २० जुलै रोजी देवदर्शन आटोपून शोभा सोनवणे मुंबईतील घरी परतल्या. २१ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बॅग तपासली असता त्यांना मोठा धक्का बसला. कारण बॅगेमध्ये त्यांनी ठेवलेले एकूण ३८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हॉटेलमध्ये (Hotel) राहण्याच्या कालावधीतच अज्ञाताने हे दागिने (Jewelry) चोरल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलिसांत (Police) धाव घेतली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)
ठाणे : डोंबिवली स्थानकातून (Dombivali Railway Station) सकाळी ७:५६ वाजता सुटलेल्या तुफान गर्दीच्या लोकल ट्रेनमधून एक महिला प्रवासी अचानक रेल्वे रुळावर पडल्याची ...
चोरीस गेलेले दागिने
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या बांगड्या (१०० ग्रॅम): ९,००,००० रुपये, सोन्याच्या पाटल्या (८० ग्रॅम): ७,००,००० रुपये, सोन्याची मंगळसूत्र (९० ग्रॅम): ६,००,००० रुपये, सोन्याचे कडे (७० ग्रॅम): ४,००,००० रुपये, सोन्याची साखळी (४० ग्रॅम): २,५०,००० रुपये, सोन्याच्या वळ्या (१५ ग्रॅम): १,५०,००० रुपये, सोन्याच्या अंगठ्या (१५ ग्रॅम): १,५०,००० रुपये असे एकूण ३८५ ग्रॅम वजनाचे ३१ लाख ५० हजार रुपयांचे दागिने लंपास झाले आहे.