Gadkari Movie : 'गडकरी' चित्रपटातील नितीन गडकरींचा चेहरा आला समोर; 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

कोण कोण कलाकार मंडळी असणार?


मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या आयुष्यावरील 'गडकरी' (Gadkari Movie) या सिनेमाची पोस्टर लाँचद्वारे घोषणा करण्यात आली होती. मात्र, या पोस्टरमध्ये नितीन गडकरींची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता पाठमोरा उभा होता. काही दिवसांपूर्वी याचा टीझरही लाँच करण्यात आला होता, मात्र यातही चेहरा दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे हा हायवे मॅन साकारणारा अभिनेता नेमका कोण असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर लाँच झाले असून यातील 'गडकरी' यांचा चेहरा समोर आला आहे. राहुल चोपडा (Rahul Chopda) असं या मुख्य अभिनेत्याचं नाव आहे.


नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. या व्यतिरिक्त नितीन गडकरी यांचे सहकारी रमेश हिमते यांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, प्रमोद बुरावार यांच्या भूमिकेत पुष्पक भट दिसणार आहेत. तर गिरीश व्यास आणि श्रीपाद रिसाळदार यांच्या भूमिकेत अनुक्रमे अभय नवाथे, वेदांत देशमुख दिसतील. पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे.





भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. प्रेक्षकांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण