पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले.


पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. भावी पिढीने देखील त्यातून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


स्मारकासाठी झालेल्या भूसंपादनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वाड्यातील भाडेकरूंनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत वाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली होती. त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्व बाबींची पूर्तता करून स्मारकाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

Comments
Add Comment

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 16 तास पाणीपुरवठा बंद, कोणकोणत्या परिसराला फटका बसणार? वाचा यादी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणीपुरवठा विषयक कामे हाती घेण्यात येणार

24 तासांचा प्रवास 16 तासांत, मुंबई CSMT- बेंगळुरू मार्गावर धावणार दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन; भाडं किती?

मुंबई: मुंबई- बेंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई CSMT- बेंगळुरू मार्गावर

Airoli Katai Naka: ऐरोली-काटई नाका पुलाच्या कामासाठी 4 दिवस वाहतूक बंद, वाहन चालकांसाठी असे असतील पर्यायी मार्ग

नवी मुंबई: ठाणे आणि नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे- बेलापूर मार्गावरील ऐरोली- काटई नाका पुलाच्या

कॅप्टन मच्छार यांच्या कुटुंबीयांना BMC च्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट, स्मित यांच्या तब्येतीची केली विचारपूस

मुंबई: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या 'फ्लाई- दुबई' कंपनीच्या विमानामध्ये सह वैमानिकाकडून झालेल्या प्राणघातक चाकू

Mumbai Local: रेल्वेचे 'हे' नियम मोडल्यास भरावा लागणार इतका दंड, वाचा नियमावली...

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. विनातिकिट, बनावट तिकिट, दुसऱ्यांचा

दैनिक प्रहारच्या ‘किलबिल चित्रकला’ स्पर्धेला उदंड प्रतिसाद, 850 बाल चित्रकारांचा सहभाग

मुंबई: दैनिक प्रहारचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत