Rohit Sharma : रोहित शर्माचा काय हा निष्काळजीपणा! स्वतःच्या आलिशान गाडीने गेला पण...

भारताच्या कर्णधाराने असं कृत्य करणं बरं नव्हे...


मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या वर्ल्डकपचे (Cricket World cup 2023) वारे वाहत आहेत. मात्र, हे वारे उलट्या दिशेने वाहतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, तुलनेने दुबळे संघ तगड्या संघांविरोधात बाजी मारत आहेत. त्यामुळे भारतालाही आता प्रचंड सावध राहून खेळण्याची गरज आहे. असं असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मात्र निष्काळजीपणा केला आहे.


त्याचं झालं असं की, अहमदाबादमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामना संपल्यानंतर रोहित शर्मा पवन हंस हेलिकॉप्टरने मुंबईला आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला होता. तिथे दोन दिवस मजेत घालवल्यानंतर तो पुन्हा संघात सामील होण्यासाठी सज्ज झाला. यासाठी मंगळवारी तो मुंबईहून पुण्याला जायला निघाला. मात्र, जाताना त्याने आपली आलिशान स्पोर्ट्स कार लेम्बोर्गिनी उरस तब्बल २०० किमी प्रति तास अथवा त्याहूनही अधिक वेगाने चालविली. यासाठी त्याला तीन चालानही बजावण्यात आले आहेत.


वाहतूक विभागाच्या नियमांनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वेग मर्यादा ताशी १०० किलोमीटर एवढी आहे. मात्र, आपल्या कर्णधाराने गाडी दुप्पट वेगाने चालवली. प्रवासादरम्यान रोहित शर्माने वाहतुकीचे नियम मोडले. ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने कधीकधी २०० किमी/तास हून अधिक, तर कधी-कधी २१५ किमी/तास एवढ्या प्रचंड वेगाने कार चालवली. या मुळे, त्याच्या कारच्या नंबर प्लेटवर तीन ऑनलाइन ट्रॅफिक चालान जारी करण्यात आले आहेत.

वाहतूक विभागाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "वर्ल्ड कप सुरू असताना भारतीय कर्णधाराने एवढ्या वेगाने कार चालवणे अयोग्य आहे. त्याने संघाच्या बसनेच प्रवास करायला हवा आणि त्याच्या सोबत पोलिसांची गाडीही असायला हवी". अख्खा भारत ज्यांच्याकडे आपले आदर्श म्हणून पाहतो, ज्या क्रिकेट वर्ल्डकपकडे अख्ख्या देशाचे डोळे लागून राहिले आहेत, त्या भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराने असं कृत्य करणं बरं नव्हे, अशा प्रतिक्रिया यामुळे उमटत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४