Bigg Boss 17 : म्हणून अंकिता लोखंडे बिग बॉस १७ मध्ये आली!

मुंबई : भारतीय मनोरंजन उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉस १७ च्या (Bigg Boss 17) घरात प्रवेश करून चर्चेत आले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये लग्न करणारे हे जोडपे या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत पण टीव्ही आणि चित्रपटांमधील यशस्वी कारकीर्दीनंतर अंकिता लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये का सामील झाली? तिने बिग बॉस मध्ये येण्याचा निर्णय का घेतला हे तिने स्वतःच स्पष्ट सांगितले आहे.


अंकिताने बिग बॉस १७ मध्ये सहभागी होण्याच्या तिच्या निर्णयामागील खरे कारण उघड केले. अंकिता म्हणते “मी बिग बॉस १७ शोमध्ये आले आहे कारण लोक मला अर्चना म्हणून ओळखतात, आता त्यांनी अंकिताला ओळखावे, माझी खरी ओळख अंकिता म्हणून व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी जशी आहे तसं मला लोकांनी स्वीकारावं असं मला वाटतं."


अंकिता "पवित्र रिश्ता" मधल्या अर्चना देशमुखच्या तिच्या प्रतिष्ठित भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. अंकिताने २००९ ते २०२४ पर्यंत पाच वर्षे अर्चनाची भूमिका केली आणि तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळवले. अंकिता लोखंडे ही बिग बॉस १७ मधील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून खूप पाठिंबा मिळत आहे आणि कौतुक होत आहे. शोमध्ये तिच्या उपस्थितीने प्रेक्षक खऱ्या अंकिता लोखंडेला बघण्यासाठी उत्सुक आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Sanjay Dutt : संजय दत्तच्या ‘शांतते’च्या वक्तव्यावरून वाद ! आता स्पष्टीकरण, म्हणाला- ‘भावना दुखावण्याचा हेतू नव्हता’

Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. शेखर सुमन यांच्या ‘शेखर टूनाइट’ या चॅट

मेगास्टार अनिल कपूर यांना एशियन अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये 'सुभेदार' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार !

अनेक दशकांच्या विलक्षण कारकिर्दीनंतरही मेगास्टार अनिल कपूर हे त्यांच्या सिनेमॅटिक प्रवासात कायम चर्चेत असतात.

Khatron Ke Khiladi 15 : खतरों के खिलाड़ी 15 ची ट्रॉफी अविनाश मिश्राच्या हाती! 20 लाखांच्या बक्षीसासह जिंकली लक्झरी कार

Khatron Ke Khiladi 15 : खतरों के खिलाडी 15 या लोकप्रिय स्टंट रिअॅलिटी शोचा विजेता अखेर जाहीर झाला आहे. अभिनेता अविनाश मिश्रा याने

स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेतेय निरोप; अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केल्या आठवणी

स्टार प्रवाह वाहिनीवरील नावाजलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. गेले ११ महिने अनेक नाट्यमय वळणांमुळे,

Maatrubhumi Movie: सलमान खानच्या मोस्ट अवेटेड 'मातृभूमी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी; केंद्र सरकारकडून हिरवा कंदील

नवी दिल्ली: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान लवकरच एका नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 2020 साली

२३ ऑक्टोबरला पडद्यावर धडकणार 'दशमी'; नव्या संघर्षाची रहस्यमय कथा!

केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट सस्पेन्स, क्राईम, थरार आणि सामाजिक वास्तव यांची दमदार सांगड घालत