विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला, देवी दुर्गेने महिषासुराचा संहार केला... पण आजच्या काळातील अन्यायाविरुद्ध कोण उभे राहणार? याच प्रश्नाला थरारक आणि रहस्यमय पद्धतीने भिडणारा ‘दशमी’चा प्रवास प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे. ‘दशमी’ची कथा रहस्याच्या अनेक स्तरांनी विणलेली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथानकातील प्रत्येक धागा प्रेक्षकांना वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहे. नवे प्रश्न, अनपेक्षित वळणे, वाढता तणाव आणि धक्कादायक खुलासे यामुळे पडद्यावर नेमकं पुढे काय घडणार, याचा अंदाज बांधणं कठीण होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘दशमी’ हा केवळ रहस्य आणि थराराचा खेळ नाही, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद देणारा विचार आहे. प्रत्येक मुलीने निर्भयपणे जगावं आणि तिच्या हक्कासाठी समाजानेही ठामपणे उभं राहावं, हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे, असे दिग्दर्शक सांगतात.
९० च्या दशकात आपल्या विनोदी अभिनयाने आणि नृत्याने घराघरांत पोहोचलेला अभिनेता गोविंदा आणि नव्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री कोमल ...
भव्य दृश्यरचना, दर्जेदार तांत्रिक बाजू आणि मोठ्या पडद्याला साजेसं सादरीकरण हे ‘दशमी’चं खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक फ्रेम बारकाईने साकारण्यात आली असून, मराठी सिनेमातील सस्पेन्स-क्राईम थ्रिलरला एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासोबत दाक्षिणात्य स्टार रवि प्रकाश महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांच्या अभिनयाची ताकद आणि रहस्याने भरलेली कथा यामुळे ‘दशमी’ची उत्सुकता आणखी वाढली आहे.