Manoj Jarange : राज्यभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा!

सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावागावात 'नो एन्ट्री'!


जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना आपापल्या गावांमध्ये गावबंदी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या १०९ गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आहे, अशा आशयाचे फलक गावाच्या चौका-चौकात लागलेले आहेत.


लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी आणि पंढरपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असे फलक दिसून येत आहेत.


विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना त्यांच्याच मतदारसंघातल्या एका गावात प्रवेश करायला गावकऱ्यांनी बंदी केली. यामुळे बनसोडे यांना गावाच्या प्रवेशद्वारापासून परत फिरावं लागलं. लातूर शहरचे आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्याही विरोधामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी केली. तुम्ही विधानसभेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काहीही बोलला नाहीत, असे म्हणत दोन्हीही देशमुख बंधूंच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.


पंढरपुरातही सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री!


विठ्ठल नगरी पंढरपुरात आजपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच प्रवेश दिला जाणार आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच सर्व आमदार खासदार विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळेल. विविध पक्षांच्या मराठा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.


नांदेडमध्येही आरक्षणासाठी आंदोलन


नांदेडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. नायगांव तालुक्यातील पळसपूर - टाकळगांव या गट ग्रामपंचायतीच्या शेकडो गावकऱ्यांनी एकत्रित येत सामूहिक शपथ घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर गावात कुठल्याच राजकीय नेत्यांनी येऊ नये, अशी बॅनर बाजी गावकऱ्यांनी केली आहे. गावकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदारपणे नारेबाजी करत आरक्षणाची मागणी लावून धरली.


दरम्यान, नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये निषेधाचे काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून या तरुणांकडे झेंडे काढून घेतले.


एकूणच गावोगावी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंवा मिळत असून अनेक गाव आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून