Maratha Suicides : हिंगोलीत मराठा तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र सुरुच


हिंगोली : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता दुसर्‍यांदा उपोषण मागे घेतलं आहे. जरांगे यांनी (Maratha Samaj) राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणावर काम करण्यासाठी मुदत दिली आहे. तोपर्यंत जरांगे महाराष्ट्रभर मराठ्यांच्या भेटीगाठीसाठी १५ नोव्हेंबरपासून दौरे करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी ही काहीशी सकारात्मक चिन्हे असली तरी या मागणीसाठी आत्महत्येच्या घटना (Suicide Cases) काही थांबायचे नाव घेत नाहीत. मनोज जरांगेंनी अनेकदा आत्महत्या न करण्याचे आवाहन करुनसुद्धा हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात एका तरुणाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील आदिनाथ राखोंडे या २७ वर्षीय तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली. तो उच्चशिक्षित असतानाही नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ज्यात त्याने त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे.


चिठ्ठीमध्ये आदिनाथने लिहिलं की, 'एक मराठा लाख मराठा...मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्रीपर्यंत माझे जीवन संपवत आहे'. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा