Good News : घरातूनच घ्या अयोध्येच्या दीपोत्सवात सहभाग!

अयोध्येत २१ लाख दिवे लावून विश्वविक्रम करण्याची तयारी


दिवा आणि शरयूचे पाणी प्रसाद म्हणून पाठवणार


अयोध्या : अयोध्येचा दीपोत्सव (Deep Festival) दिव्य आणि भव्य करण्यासाठी जय्यत तयारी करणाऱ्या पर्यटन विभाग आणि अयोध्या जिल्हा प्रशासनाने यावेळी २१ लाख दिवे लावून विश्वविक्रम करण्याची तयारी केली आहे. यासोबतच लोकांना घरी बसून दिवाळी सणाचा भाग बनण्याची संधीही देण्यात आली आहे.


पर्यटन विभागाने 'होली अयोध्या' ॲपद्वारे दिव्यांची बुकिंग सुरू केली आहे. ॲपच्या माध्यमातून कोणीही एक ते ५१ दिवे दान करू शकतो आणि ते अयोध्येत घरी बसून प्रज्वलित करू शकतो. एका दिव्यासाठी १०१ रुपये, ११ दिव्यासाठी २५१ रुपये, २१ दिव्यांसाठी ५०१ रुपये आणि ५१ दिव्यांसाठी ११०० रुपये खर्च करावे लागतील.



पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मुकेश मेश्राम यांनी सांगितले की, विभागाने ‘होली अयोध्या’ नावाचे मोबाइल ॲप तयार केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घरबसल्या अयोध्येच्या दीपदानात सहज सहभागी होता येणार आहे.


हे मोबाइल ॲप अँड्रॉइड आणि ॲपल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कोणतीही व्यक्ती हे ॲप डाउनलोड करून त्याच्या नावावर एक किंवा अधिक दिवे बुक करू शकते. विशेष म्हणजे दीपोत्सवानंतर पर्यटन विभाग संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर हा दिवा आणि शरयूचे पाणी प्रसाद म्हणून पाठवणार आहे. या ॲपद्वारे ठराविक रक्कम देऊन कोणीही दिवे लावू शकतो. जिल्हा प्रशासन या ॲपवर आलेल्या अर्जांची पाहणी करून त्यानुसार दिवे लावण्याची व्यवस्था करणार आहे. केवळ देशच नाही तर परदेशात राहणार्‍या लोकांनीही या दीपोत्सवात सामील व्हावे, असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी ही चांगली सुविधा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात