ICC Hall of fame मध्ये पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेटपटूचा सन्मान

सोबत आणखी दोन क्रिकेटपटूंचा समावेश


नवी दिल्ली : आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ (ICC World Cup 2023) मधील साखळी फेरीतील सर्व सामने संपले असून १५ नोव्हेंबरला पहिली उपांत्य फेरी (Semi finale)भारत आणि न्यूझीलंड (India vs Newzealand) यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede stadium) होणार आहे. या सामन्याआधी आयसीसीने एक मोठी घोषणा केली. महिला क्रिकेटपटू डायना एडुल्जी (Diana Edulji) यांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of fame) समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. याशिवाय भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि श्रीलंकेचा दिग्गज अरविंदा डीसिल्वा (Arvinda De Silva) यांचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हॉल ऑफ फेममध्ये समावेश करुन सन्मान केला आहे.


डायना एडुल्जी यांनी देशाचे १७ वर्ष प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी भारतासाठी २० कसोटी, ३४ वनडे सामन्यात अनुक्रमे ६३ आणि ४६ विकेट घेतल्या. १९९३च्या वर्ल्डकपनंतर डायना यांनी निवृत्ती घेतली होती. तर वीरेंद्र सेहवागने भारताकडून १०४ कसोटी, २५१ वनडे, १९ टी-२० सामन्यात मिळून १७ हजारहून अधिक धावा केल्या. कसोटीत २ वेळा त्रिशतक करणाऱ्या चार फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. अरविंदा डी सिल्वाने श्रीलंकेकडून ९३ कसोटी, ३०८ वनडे मॅच खेळल्या. २००३ च्या वर्ल्डकपनंतर अरविंदाने निवृत्ती घेतली होती. त्याच्या नावावर १५ हजार ६४५ आंतरराष्ट्रीय धावा आणि १३५ विकेट आहेत. या तिन्ही क्रिकेटपटूंच्या समावेशानंतर आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेल्या खेळाडूंची संख्या ११२ एवढी झाली आहे.


वीरेंद्र सेहवाग आणि डायना एडुल्जी यांच्यापूर्वी ७ भारतीय क्रिकेटपटूंना हा सन्मान मिळाला होता. सर्वप्रथम २००९ मध्ये बिशन सिंह बेदी (Bishan Singh Bedi) आणि सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला होता. त्यानंतर २०१० मध्ये कपिल देव (Kapil Dev) यांना हा सन्मान मिळाला होता. पुढे २०१५ मध्ये अनिल कुंबळेचा (Anil Kumbale) हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला होता, तर २०१८ मध्ये राहुल द्रविडलाही यात स्थान मिळाले. आयसीसीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) २०१९ मध्ये हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला. तर विनू मांकड यांना २०२१ मध्ये या यादीत स्थान मिळाले होते.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात