गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग,पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरिकांची तारांबळ

पंचवटी (प्रतिनिधी)- गंगापूर धरणातून(gangapaur) जायकवाडी धरणासाठी सायंकाळीं पाच वाजेपर्यंत जवळपास ३१२२ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदाघाट परीसरासह पंचवटीत चांगलीच तारांबळ उडाली ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.


गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे गोदाघाट जलमय झाला होता. ऐन हिवाळ्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण व हवेत गारवा निर्माण झाला होता.


पंचवटी सह नाशिक शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊसाने चांगलीच हजेरी लावली. यांमुळे मुख्य बाजारपेठेत ग्राहक आणि विक्रेते यांची धावपळ पाहायला मिळाली. गोदा काठावरील विक्रेत्यांना विक्रीची दुकाने व वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्यात आली.


पंचवटीतील, गोदाघाट, राम कुंड, भाजी बाजार, आडगाव नाका, मालेगांव स्टॅण्ड, येथील नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. तसेच पंचवटीलगतच्या ग्रामीण भागातील मखमलाबाद, दरी, मातोरी, म्हसरुळ, आडगाव, नांदूर, मानूर या शिवारातील रब्बी हंगामाच्या पिकांसह द्राक्षाला या पावसाने फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.



नियोजनाचा फज्जा


अचानक झालेल्या पावसाने मनपाच्या रस्ते, खड्डे, पावसाळी गटार योजनेचा व नियोजनाचा पुन्हा एकदा फज्जा उडाला. रस्त्यावर व खड्ड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून आले. व सध्या सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या व नवीन रस्त्याच्या डांबरीकरणाचे तीन तेरा वाजले. यातून मनपाच्या अनियमित नियोजनाचे दर्शन नागरिकांना झाले.

Comments
Add Comment

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड