Piyush Ranade Marriage : अरे हा किती लग्नं करणार? तिसर्‍या लग्नावर अभिनेता पीयुष रानडे झाला ट्रोल

पीयुषने सुरुची अडारकरसोबत बांधली तिसरी लग्नगाठ; पहिल्या दोन पत्नीही आहेत प्रसिद्ध अभिनेत्री...


मुंबई : लग्न करताना प्रचंड उत्साही होत सोशल मीडियावर लग्नाचे फोटोज शेअर करणं आणि काही दिवसांतच जोडप्याची घटस्फोटाची बातमी येणं यात आता काही नवीन राहिलेलं नाही. किंबहुना अनेक कलाकार घटस्फोटानंतर दुसरा जोडीदारही लगेच निवडतात. अनेकजण या गोष्टीला पाठिंबा दर्शवत असले तरी दुसरीकडे अनेकजण त्यांना ट्रोलही करतात. पण ट्रोल करणार्‍यांकडे ही जोडपी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात.


हल्ली अनेक मराठी कलाकारही सर्रास घटस्फोट आणि पुन्हा लग्न करत आहेत. मराठी कलाकारांनी असं वागलेलं चाहत्यांना मात्र रुचत नाही. अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता पीयुष रानडे (Piyush Ranade) याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. पीयुषने सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) या मराठी अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न केलं आहे. या जोडप्याने आज त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social media) लग्नाचे फोटोज शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. यावर अनेक मराठी कलाकारांनी व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तर दुसरीकडे पीयुषला तिसर्‍या लग्नासाठी ट्रोल करण्यात आलं आहे.


नेटकर्‍यांनी कमेंट सेक्शनमध्ये 'अरे हा किती लग्नं करणार? हे तिसरं लग्न' असं म्हणत पीयुषला ट्रोल केलं आहे. तर एकाने 'हे लग्न तरी कृपया टिकव' असा सल्ला दिला आहे. दुसर्‍या एका युजरने सुरुचीला 'मॅम जरा विचार तरी करायचा होता', असा सल्ला दिला आहे.



कोण होत्या पीयुषच्या पहिल्या दोन पत्नी?


अभिनेता पीयुष रानडेने पहिल्यांदा २०१० साली शाल्मली टोळ्ये (Shalmali Tolye) या अभिनेत्रीसोबत विवाह केला होता. मात्र, २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१६ मध्ये त्याने अभिनेत्री मयुरी वाघशी (Mayuri Wagh) लग्नगाठ बांधली. 'अस्मिता' मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती आणि काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास दोन वर्षे त्यांनी मालिकेत सोबत काम केले आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. पण हेही लग्न फार काळ टिकू शकलं नाही.


पीयुष रानडेने आता सुरुची अडारकरसोबत विवाह केला आहे. पीयुष आणि सुरुचीने एकत्र ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत काम केले होते. या दरम्यानच त्यांचे सूत जुळले असल्याची शक्यता आहे. त्यानंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.





सुरुची देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २००६ मध्ये सिनसृष्टीत पदार्पण केले. पेहचान या मालिकेत ती झळकली. त्यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये काम केले. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर सुरुची ही ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकली. सध्या ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर पीयुष हा सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत विश्वजीतच्या भूमिकेत दिसत आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी