PM Narendra Modi : भारतात काँग्रेस असताना 'मनी हाईस्ट'ची गरज काय?

धीरज साहू प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला टोला


नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) सध्या एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे. काँग्रेसचे खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीत रग्गड काळा पैसा आढळून आला आहे. आयकर विभागाने (IT Department) केलेल्या छापेमारीत (Raid) ३५३ कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे. ही रक्कम मोजण्याकरता मागवण्यात आलेल्या मशीन्सदेखील नोटा मोजता मोजता बंद पडल्या तरीही नोटांची मोजणी पूर्ण झालेली नाही. या प्रकरणामुळे काँग्रेसचा संपूर्ण भ्रष्टाचार आता समोर आला आहे. यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देखील काँग्रेसवर उपहासात्मक टीका केली आहे.


पंतप्रधानांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन (X Account) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी भाजपाच्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर केलेला एक व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. धीरज साहूंच्या घरी आढळून आलेला काळा पैसा व्हिडीओमध्ये दिसत आहे. कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, 'भारतात काँग्रेस असताना मनी हाईस्ट (Money Heist) सारख्या काल्पनिक गोष्टीची गरजच काय? त्यांचा भ्रष्टाचार ७० वर्षांपासून चालत आला आहे आणि अजूनही सुरुच आहे', असा टोला मोदींनी लगावला आहे.





सहा दिवसांपूर्वी झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील धीरज साहूंच्या ९ ठिकाणांवर छापे टाकून त्यांची झडती घेण्यात आली होती. तर बलांगीर आणि तितलागड येथील दारूच्या भट्ट्यांमधून देखील मोठी रोकड जप्त करण्यात आली. आयकर विभागाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. आता यावर ईडीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि