ISRO New Mission : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोकडून खुशखबर

'एक्सपोसॅट' मोहिमेचं यशस्वी उड्डाण; 'यासाठी' ठरला भारत जगातील दुसरा देश


श्रीहरिकोटा : मागील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) इतिहास रचला होता. त्यानंतर आज नववर्षाच्या (New year) पहिल्याच दिवशी इस्रोने एक मोठी मोहिम फत्ते केली आहे. देशभरात नववर्षाचा जल्लोष आणि उत्साह साजरा होत असतानाच इस्रोने देखील आपली नव्या वर्षातील पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत 'क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह' (Xposat Mission) मिशनचे यशस्वी प्रक्षेपण करत जल्लोष साजरा केला.


इस्रोने १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पीएसएलव्ही (PSLV C58) रॉकेटच्या मदतीने 'क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह' (Xposat Mission) मिशनचं प्रक्षेपण केलं. यानंतर सुमारे २२ मिनिटांमध्ये हा उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, नव्या वर्षातील पहिली मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली. मिशनच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे.


XPoSAT हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल. त्यांच्या स्रोतांचे फोटो घेईल. त्यात बसवलेली दुर्बीण रमण संशोधन संस्थेने बनवली आहे. हा उपग्रह विश्वातील ५० तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे, जसं की पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा इत्यादी. हा उपग्रह ६५० किमी उंचीवर पाठवण्यात येणार आहे.


इस्रोने २०१७ मध्ये हे अभियान सुरू केलं होतं. या मोहिमेचा खर्च ९.५० कोटी रुपये आहे. २०२३ मध्ये चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मिशनद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-१ मिशनद्वारे (Aditya L-1 Mission) सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोने यावर्षी अंतराळ क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे. यामुळे नववर्षात भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा