Hingoli Accident : अंधारात रस्ता न कळल्याने चुकले वळण! आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

हिंगोलीत भीषण अपघात


हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, एका दुचाकीच्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये हा अपघात घडला. काल रात्रीच ही अपघाताची घटना घडली, मात्र या ठिकाणी जास्त रहदारी नसल्याने त्यांना रात्री कोणाचीही मदत मिळाली नाही आणि सकाळी हा अपघात उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण वाणी गावावर शोककळा पसरली आहे. आकाश कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव अशी मयत व्यक्तींची नावे आहेत.


हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील रहिवासी असलेले आकाश जाधव हे काल सायंकाळी आपल्या आई कलावती जाधव आणि वडील कुंडलिक जाधव यांना घेऊन वैद्यकीय कामानिमित्त रुग्णालयात निघाले होते. दरम्यान, अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे डिग्रस वाणी गावाच्या शिवारात त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातामध्ये आकाश जाधव यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचा जागीच मृत्यू झाला.



घटनास्थळी पोलीस दाखल...


डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याची माहिती अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना देऊन, मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी गर्दी केली.


Comments
Add Comment

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला FDA चा दणका; परवाने निलंबित!

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी पुण्यातील दोन प्रसिद्ध उपाहारगृहे, हॉटेल वैशाली आणि हॉटेल रुपाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली होणार मंत्री नितेश राणे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव खासगी बस पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली; एकाचा मृत्यू, तर 20 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर एका भीषण अपघाताची थरारक घटना समोर आली

बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाची शक्यता; उत्तरेकडून थंड वारे! महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट की कडाक्याची थंडी?

मुंबई : राज्यात एकीकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची चाहूल लागत असतानाच, दुसरीकडे बंगालच्या

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं मोठं गिफ्ट! 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने'ला वेग, 25 मतदारसंघांत सह- अध्यक्षांची नियुक्ती!

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक, रविवारची स्थिती काय?

पालघर: पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे