पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला FDA चा दणका; परवाने निलंबित!

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रुपालीचे परवाने FDA ने तात्पुरते निलंबित केले. अस्वच्छ स्वयंपाकघर, अन्नाची अयोग्य साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी पुण्यातील दोन प्रसिद्ध उपाहारगृहे, हॉटेल वैशाली आणि हॉटेल रुपाली यांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत. तपासणीत शौचालयांजवळ अन्न साठवणूक, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि तयार खाद्यपदार्थांची अयोग्य हाताळणी यासह अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार खाद्यपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले जाते होते. तर इडली आणि डोशाचे पीठ उघड्या आणि अस्वच्छ ठिकाणी तयार केले जात होते.


महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाने क्रॉस कंटॅमिनेशनच्या म्हणजेच पदार्थ एकमेकांत मिसळण्याच्या धोक्याकडेही लक्ष वेधले. कारण तयार खाद्यपदार्थांच्या थेट वर कच्च्या कापलेल्या भाज्या ठेवल्या जात होत्या. तसेच स्वयंपाकघरात कीटकरोधक दरवाजे नव्हते, असाही आरोप आहे. 'तापमान निरीक्षणाच्या नोंदी आणि अद्ययावत पिण्याच्या पाण्याची चाचणी अहवाल उपलब्ध नव्हते. शिवाय तपासणीदरम्यान वैध FoSTaC - प्रशिक्षित अन्न व सुरक्षा पर्यवेक्षक उपस्थित नव्हता,' असे सहायक आयुक्त  म्हणाले, ज्यांनी त्या आस्थापनांच्या अन्न व्यवसाय परवान्याच्या तात्काळ निलंबनाचे आदेश दिले.






अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी १३ नोव्हेंबर रोजी हॉटेल रुपालीची पाहणी केली आणि स्वयंपाकघरातील परिस्थिती असुरक्षित असल्याचा अहवाल दिला. 'स्वयंपाकघर उघडे आणि अपुरे सुरक्षित असल्याचे आढळून आले, ज्यामुळे अन्न तयार करण्याची जागा धूळ, घाण आणि कीटकांच्या संपर्कात येत होती. परिसरात पाणी साचणे, अपुरी स्वच्छता आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या अयोग्य पद्धती आढळून आल्या,' असे एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार कच्चा माल, अर्ध प्रक्रिया केलेले अन्न आणि तयार खाद्यपदार्थ योग्य आवरण, लेबलिंग आणि वापरण्याची अंतिम तारीख या माहितीशिवाय साठवण्यात आले होते. याविरुद्ध एफडीएच्या पुणे विभागाने कडक कारवाई केली आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली होणार मंत्री नितेश राणे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव खासगी बस पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली; एकाचा मृत्यू, तर 20 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर एका भीषण अपघाताची थरारक घटना समोर आली

बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाची शक्यता; उत्तरेकडून थंड वारे! महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट की कडाक्याची थंडी?

मुंबई : राज्यात एकीकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची चाहूल लागत असतानाच, दुसरीकडे बंगालच्या

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं मोठं गिफ्ट! 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने'ला वेग, 25 मतदारसंघांत सह- अध्यक्षांची नियुक्ती!

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक, रविवारची स्थिती काय?

पालघर: पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे

Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र