Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक, रविवारची स्थिती काय?

Mumbai Local Megablock: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान शनिवारी आणि रविवारी रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनो जर तुम्ही रात्रीच्या वेळी प्रवास करणार असाल, तर ही बातमी आवश्य वाचा

पालघर: पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो जर तुम्ही शनिवारी रात्री उशिरा पश्चिम रेल्वेने प्रवास करणार असाल तर, एकदा ही बातमी आवश्य वाचा. पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकादरम्यान काही तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जलद मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्हीही मार्गिकेंवर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आल्यानंतर, रविवारच्या दिवशी पूर्ण दिवस, पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान शनिवारी आणि रविवारी 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबरच्या रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, विनीत अभिषेक यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा 'जम्बो ब्लॉक' शनिवारी आणि रविवारीच्या रात्री वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान 'अप' (Up) जलद मार्गावर रात्री 11.55 ते मध्य रात्री 02.55 पर्यंत आणि 'डाउन' (Down) जलद मार्गावर मध्य रात्री 01.30 ते पहाटे 04.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी, 15 नोव्हेंबर 2026 रोजी दिवसाच्या वेळी कोणताही 'जम्बो ब्लॉक' नसेल.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी, 15 नोव्हेंबर 2026 रोजी उपनगरीय मार्गांवर 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' धिम्या मार्गांवर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मुलंड स्थानकावरून सुटणाऱ्या 'डाऊन' धिम्या आणि सेमी फास्ट लोकल सेवा सकाळी 10.43 ते दुपारी 03.53 या वेळेत मुलंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील. कल्याण स्थानकावरून सुटणाऱ्या 'अप' धिम्या आणि सेमी फास्ट लोकल सेवा सकाळी 10.36 ते दुपारी 03.51 या वेळेत कल्याण आणि मुलंड स्थानकांदरम्यान 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील.
Comments
Add Comment

Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र

अहिल्यानगरमध्ये दीपावलीच्या रात्री 21 ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळल्या दुर्घटना

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणानिमित्त अहिल्यानगर शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच,

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने 15 वाहनांना उडवले, सुदैवाने जीवित हानी नाही

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी

Maharashtra ST : एसटीच्या 13,980 पदांच्या कंत्राटी भरतीत फसवणूक झाल्यास कठोर कारवाई; खासगी संस्थांची चौकशी होणार

Mumbai News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच सुमारे 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात ! ट्रकने खासगी बसला 200 मीटर फरफटत नेले अन्... 38 प्रवासी जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावर शुक्रवारी (दि. 13

Maharashtra : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! 2.96 लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; 1.88 कोटी रुपये परत

मुंबई : राज्यातील दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने