Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक! काय होती भूमिका?

पुणे : पुण्यात (Pune News) भरदिवसा करण्यात आलेल्या शरद मोहोळ याच्या हत्येमुळे (Sharad Mohol Murder) अख्खं पुणे हादरलं. त्याच्या साथीदारांनीच कट रचून त्याची हत्या केली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या हत्येनंतर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या आरोपींना पकडायला पोलिसांना फार काळ लागला नाही. या प्रकरणी पोलिसांनी दोन वकिलांसह आठजणांना ताब्यात घेतले. आता पुन्हा या प्रकरणी दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.


धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हत्येसाठी पिस्तुल पुरवण्याचं काम या दोघांनी केलं होतं. शरद मोहोळचा ५ जानेवारी भरदुपारी सुतारदरा येथील घरासमोर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. महत्वाचे म्हणजे, आरोपींनी मुळशी तालुक्यात तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्याचा सराव केला होता. या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.


साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, मुळशी), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा) अशी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहोळ खून प्रकरणात यापूर्वी आठ जणांना अटक केली असून, त्यापैकी या सहा जणांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, त्यानंतर आरोपींच्या कोठडीत पुन्हा सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा