Board Exams : परिक्षेला वेळ पुरत नाही? चिंता नको, दहावी-बारावीच्या बोर्डाने घेतला 'हा' मोठा निर्णय!

कॉपीमुक्त परिक्षांसाठी भरारी पथकांची संख्याही वाढवणार


मुंबई : दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा (10th and 12th Board Exams) म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर एक जरी चूक झाली तरी ती बराच काळ सलत राहते. अनेकदा विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असून व उत्तर येत असूनही लिहायला मात्र वेळ पुरत नाही, त्यामुळे हातचे मार्क गमवावे लागतात. यासाठीच दहावी-बारावीच्या बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षापासून परिक्षांसाठी दहा मिनिटे वाढीव वेळ देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे गरजेचे आहे.


अनेक पालक व विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्यासाठी वेळ पुरत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. उत्तरे भरमसाठ असल्याने विद्यार्थ्यांना उत्तर येत असूनही लिहिण्यास मात्र वेळ कमी पडत होता. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक- विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी दहा मिनिटे जास्त दिली जाणार आहेत. पण, हा वाढीव वेळ पेपरच्या शेवटी असणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे.


बोर्डाच्या नवीन बदलानुसार यंदा दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत असणार आहे. अनेक शाळांनी आपले विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावर येतील, असा प्रयत्न केला. पण, बोर्डाच्या नवीन नियमानुसार ते शक्य झाले नसल्याने शाळांची चिंता वाढली आहे. परीक्षेवेळी वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे देखील सांगण्याचे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून तगडे नियोजन सुरू आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांची वाढ केली जाणार असून प्रत्येक केंद्रावर बैठे पथक असेल. त्यांच्या माध्यमातून परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार थांबविले जाणार आहेत.


इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते २२ मार्च या काळात होणार आहे.

Comments
Add Comment

महाउत्सवाची सांगता! 22 तासांची भव्य मिरवणूक अन् अखेरचा निरोप; लालबागच्या राजाच्या विसर्जनाला नेमका उशीर का होत आहे?

मुंबई : लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी रविवारी गिरगाव चौपाटीवर जनसागर लोटला असून, नवसाला

Prabhadevi Accident : प्रभादेवीत मोठी दुर्घटना! विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; नेमकं काय घडलं?

Mumbai : मुंबईत अनंत चतुर्दशी व गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी बाप्पाला निरोप!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी लाडक्या बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीने निरोप

एकनाथ शिंदेंमधील संवेदनशील नेत्याचा पुन्हा प्रत्यय; ड्युटीवरील पोलीस कोसळताच प्रोटोकॉल बाजूला सारून धावले!

अनंत चतुर्दशीच्या गडबडीत व्हीआयपी बंदोबस्ताचा ताण आणि सकाळपासूनचे कर्तव्य यामुळे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस

Vasai- Virar News: 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने'तील रुग्णांसाठी आनंदाची बातमी, मिळणार मोफत पौष्टिक आहार

वसई- विरार: वसई- विरार महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. 'महात्मा

Mumbai News: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, बनावट भारतीय पासपोर्टप्रकरणी 6 अफगाण नागरिक अटकेत

मुंबई: अफगाण नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात