एकनाथ शिंदेंमधील संवेदनशील नेत्याचा पुन्हा प्रत्यय; ड्युटीवरील पोलीस कोसळताच प्रोटोकॉल बाजूला सारून धावले!

ठाण्यात चक्कर येऊन कोसळलेल्या वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला सारत स्वतःच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. उपमुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे पोलीस अधिकाऱ्याचे प्राण वाचले.

अनंत चतुर्दशीच्या गडबडीत व्हीआयपी बंदोबस्ताचा ताण आणि सकाळपासूनचे कर्तव्य यामुळे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नलावडे साकेत हेलिपॅडवर अचानक चक्कर येऊन कोसळले. नेमका याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टरद्वारे पुण्याचा दौरा आटोपून तिथे लँडिंग झाले होते. आपल्या डोळ्यांसमोर खाकी वर्दीतील अधिकारी जमिनीवर कोसळल्याचे पाहताच उपमुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा ताफा आणि राजकीय बडेजाव बाजूला ठेवून थेट नलावडे यांच्या दिशेने धाव घेतली. तिथपर्यंत इतर सहकाऱ्यांनी नलावडे यांना तातडीने उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिकेत नेले होते.


एकनाथ शिंदे यांनी केवळ आदेश देऊन न थांबता, स्वतःची कार त्या रुग्णवाहिकेच्या मागे ठेवत मार्ग मोकळा करून देण्याचं काम देखील केलं. आपल्या संपूर्ण ताफ्याचा मार्ग ज्युपिटर रुग्णालयाकडे वळवत त्यांनी अत्यंत कमी वेळेत नलावडे यांना रुग्णालयात दाखल केलं. तसेच डॉक्टरांना तातडीने उपचार सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि तत्परता यामुळेच या पोलिसाचे प्राण वाचवता येणे शक्य झाले. त्यामुळे या निमित्ताने त्यांच्यातील संवेदनशील नेत्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.





उपमुख्यमंत्री स्वतः पोलिसाला घेऊन रुग्णालयात आल्याचे समजताच ठाण्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रुग्णालयात धाव घेतली. "नलावडे यांच्यावर सर्वोत्तम उपचार करा, खर्चाची कोणतीही काळजी करू नका," अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.



दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे हे नंतर आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी मुंबईकडे रवाना झाले. तर नलावडे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत. असे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार फोनवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेत आहेत.


गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस निरीक्षक विजय सांगाडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळीही त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. मात्र तरीही सांगाडे यांचा जीव वाचू शकला नाही. मात्र आज पुन्हा एकदा स्वतःच्या डोळ्यापुढे पोलीस अधिकारी कोसळताना पाहताच, शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः पुढाकार घेऊन या पोलिसाचे प्राण वाचवले.


आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे एका पोलिसाचे प्राण वाचले आहेत. या घटनेनंतर, "बाप्पाच्या आशीर्वादानेच नलावडे यांचे प्राण वाचले, मी तर केवळ निमित्तमात्र होतो," अशी अत्यंत नम्र प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईतील १० अग्निशमन केंद्र बनणार ऊर्जेत स्वावलंबी, भायखळा मुद्रणालयासाह १० अग्निशमन केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने आता वीज बचतीचा मार्ग अवलंबवण्यास सुरुवात केली असून देशाचे

मुंबई फटाक्यांनी पेटतेय! एकाच दिवसांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या १३७ घटना

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजीवर न्यायालयाने निर्बंध घातलेले असताना त्यानुसार महापालिका

महापालिकेच्या विधी खात्यातील ३५ पदे कायमचीच केली रद्द, कनिष्ठ कायदा अधिकारीपासून ते फलक परिचरपर्यंतच्या पदांचा समावेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या विधी खात्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात असून महापालिका

प्रॉपर्टी कार्डवर अखेर मुंबई महापालिकेची नावे चढली, तब्बल १८९० भूभागांच्या मालमत्ता कार्डवर नाव नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या ताब्यात आज अनेक भूखंड असले तरी यातील बहुतांशी भूखंडांच्या मालमत्ता

IRCTC कडून मुंबईहून ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वे चालवणार, अशी आहे योजना

मुंबई: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC), पश्चिम विभाग, मुंबईतर्फे भारत गौरव विशेष पर्यटन

700 ग्रॅम बाळाचं वजन 3.3 कि.ग्रॅमवर नेलं; केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळाला दिलं जीवनदान

मुंबई: मुंबईतील केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी एका बाळाला जीवनदान दिले आहे. आई 7 महिन्यांची गर्भवती असतानाच