Mumbai News: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, बनावट भारतीय पासपोर्टप्रकरणी 6 अफगाण नागरिक अटकेत

मुंबई: अफगाण नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहा अफगाण नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सहार पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून सहा अफगाणी नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. पासपोर्टची मुदत संपलेली असतानाही ते नागरिक भारतात राहत होते. त्या दृष्टीने त्यांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.



सहार पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, सहा अफगाण नागरिक पर्यटक आणि वैद्यकीय व्हिजावर भारतात आले होते. व्हिजाची मुदत संपल्यानंतर ते भारतात राहत 6 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या 41 वर्षीय नियाज खानने, खोट्या जन्मस्थानाचा वापर करून 2015 मध्ये ठाण्यात आणि 2025 मध्ये मुंबईत पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे. पोलिसांना त्याच्याकडे बनावट मतदार ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे सापडली. दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना 7 ऑगस्ट रोजी अडवण्यात आलेल्या गुल शिरुल्लाने, खोट्या जन्मस्थळाचा वापर करून 2025 मध्ये पासपोर्ट मिळवला होता. त्याने त्याच्या फोनमधील सर्व डेटा डिलिट करून टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



11 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या 37 वर्षीय हमदुल्ला हाजी लाहोरने, 2022 मध्ये “खलिजन शेख” या नावाने पासपोर्ट मिळवून त्याचा वापर अफगाणिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रवासासाठी केल्याचा आरोप आहे. 17 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेले शेरबत खान आणि सुजान खान यांनी खोट्या जन्मस्थळांचा वापर करून पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे आणि दुबईहून परतल्यानंतर त्यांना पकडण्यात आले होते. दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना 21 सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आलेला 40 वर्षीय अमजद खान, 2015 मध्ये मोहम्मद खालिद या नावाने भारतात दाखल झाला होता. त्याने 2018 मध्ये खोटी माहिती वापरून पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
Comments
Add Comment

Vasai- Virar News: 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने'तील रुग्णांसाठी आनंदाची बातमी, मिळणार मोफत पौष्टिक आहार

वसई- विरार: वसई- विरार महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. 'महात्मा

मुंबईतील भुलेश्वर परिसरात इमारतीला भीषण आग; गच्चीवर एक व्यक्ती अडकली, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू

मुंबई : शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी मुंबईतील गजबजलेल्या भुलेश्वर परिसरामध्ये एका व्यावसायिक-निवासी इमारतीला

Anant Chaturdashi 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई सज्ज; BMCच्या नियोजनाचे मंत्री आशिष शेलारांकडून कौतुक

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी चोख तयारी केली आहे.

Ganpati Visarjan 2026 : 'पुढच्या वर्षी लवकर या'! मुंबईत 11 व्या दिवशी 430 गणेश मूर्तींचे विसर्जन

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती विसर्जनाचा 11वा दिवस पार पडत आहे. दुपारी 1200

Anant Chaturdashi 2026 : अनंत चतुर्दशीला मुंबईत वाहतूक निर्बंध; 22 हजारांहून अधिक पोलीस तैनात

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल मुंबई : शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी अनंत

Nirma University Viral Video : 'जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है'; विद्यार्थ्याच्या वक्तव्यावर प्राध्यापक संतापले, स्टेजवर कॉलर पकडून...

अहमदाबाद : अहमदाबादमधील निरमा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या स्टँड-अप कॉमेडी शोदरम्यान घडलेल्या एका