Marathi Sahitya Sammelan : अमळनेरमध्ये ७२ वर्षांनी पुन्हा एकदा रंगणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

९७ व्या संमेलनाची जळगावमधून सुरुवात


जळगाव : साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांसाठी आनंदाची पर्वणी. वर्षातून एकदा अनेक साहित्यिक (litterateur) या निमित्ताने एकत्र भेटतात आणि मराठी साहित्याचा (Marathi literature) समृद्ध वारसा पुढे नेतात. यंदा साहित्य संमेलनाचे हे ९७ वे वर्ष आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (97th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) २ फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर, जळगावमध्ये (Jalgaon) सुरू होत आहे. यापूर्वी १९५२ साली अमळनेरमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर तब्बल ७२ वर्षांनी पुन्हा एकदा अमळनेरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे.


साहित्यिकांमध्ये संमेलनाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी साहित्यिकांसह दिग्गज मंत्री सुद्धा या संमेलनास हजेरी लावणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले आहे. या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.


अमळनेरात हे संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्य नगरीत तीन सभामंडप उभारण्यात आलेत. यातील सभामंडप क्रमांक एकमध्ये उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. यासाठी वाडी संस्थानपासून सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होणार आहे.


२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होईल. सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी असतील. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचसोबत इतर दोन सभामंडपांमध्ये परिसंवाद आणि कविकट्ट्याचे आयोजनही करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी