Grammy Awards 2024 : ग्रॅमी पुरस्कारांमध्ये भारतीय संगीतकारांचा डंका! शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांनी मारली बाजी

पुरस्कार सोहळ्यात झाकीर हुसैन यांनी सादरीकरणही केले


लॉस एंजेलिस : यंदा लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार २०२४ (Grammy Awards 2024) चे आयोजन करण्यात आले होते. संगीत उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठी युनायटेड स्टेट्सच्या रेकॉर्डिंग अकादमीद्वारे कलाकारांना ग्रॅमी पुरस्कार दिले जातात. यात भारतीय संगीतकारांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि तबलावादक झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांच्यासह चार संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे.


संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या धीस मुवमेंट (Shankar Mahadevan from Shakti) अल्बमचा यंदाच्या ग्रॅमी २०२४ मध्ये गौरव करण्यात आला. तसेच झाकीर हुसैन यांना बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी त्यांच्या पाश्तो (Pashto) नावाच्या अल्बमला गौरविण्यात आले. त्यात बेला फ्लेक, एडगर मेयर आणि प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया यांच्या नावाचा समावेश होता. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये झाकीर हुसैन यांनी सादरीकरणही केले.


'अॅज वी स्पिक' (As we speak) या अल्बमसाठी देखील झाकीर हुसैन आणि राकेश चौरासिया यांना गौरविण्यात आले. अशा प्रकारे यंदा तीन ग्रॅमी मिळाले असून राकेश चौरासिया यांना देखील दोन ग्रॅमीनं गौरविण्यात आले आहे. भारतीय संगीतकारांनी विख्यात अशा ग्रॅमी पुरस्कारावर आपल्या देशाची मोहोर उमटविल्याने देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.


Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?