Congress : हिमाचल प्रदेशनंतर आणखी एका राज्यात काँग्रेसला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची अवस्था बिकट


मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आलेल्या असताना काँग्रेस पक्ष (Congress party) मात्र अधिकाधिक अडचणीत सापडत चालला आहे. काँग्रेस आणि भाजप विरोधकांची इंडिया आघाडी तर काही महिन्यांतच विस्कळीत झाली. त्यानंतर महाराष्ट्रात तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. देशपातळीवरही काँग्रेसचा प्रभाव कमी होत असल्याची चिन्हे आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) आज काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. यानंतर आता आणखी एका राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.


ईशान्येकडील आसाममध्ये काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष राणा गोस्वामी (Rana Goswami) यांनी पक्ष सोडला असून ते भाजपचे कमळ हाती घेऊ शकतात. जोरगाट येथील ज्येष्ठ नेते राणा गोस्वामी यांच्याआधीही अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. नुकतेच आणखी एक कार्यकारी अध्यक्ष कमलाख्या डे पुरकायस्थ यांनीही काँग्रेसला राम-राम ठोकला होता. याशिवाय आमदार बसंत कुमार दास यांनीही भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. अशाप्रकारे गेल्या काही दिवसांतच आसाममधील तीन मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला सोडडचिठ्ठी दिली आहे.


केसी वेणुगोपाल यांच्या नावे लिहिलेल्या एका पत्रात राणा गोस्वामी यांनी म्हटले आहे, "मी आसाम काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. याशिवाय काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता म्हणूनही जबाबदारी सोडत आहे." त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांची आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचीही भेट घेतल्याचे बोलले जाते आहे. सरमा नुकतेच दिल्लीला गेले होते. यावेळी लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, राणा गोस्वामी यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते, यामुळेच ते भाजपमध्ये जाणार आहेत, अशीही चर्चा सुरू आहे.


तत्पूर्वी, सरमा यांनी कालच म्हटले होते की, राणा गोस्वामी हे जोरहाटमधील एक मजबूत नेते आहेत. जर ते आलेच तर आम्ही त्यांचे पक्षात स्वागतच करू. गोस्वामी हे दोन वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. यामुळे त्यांना २०२६ च्या विधानसभा निवडणुकीतही जोरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे आसाममध्येही काँग्रेसचा प्रभाव कमकुवत होणार आहे.



काँग्रेसमध्ये केवळ मुस्लीम आमदारच शिल्लक राहतील 


२०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १२६ पैकी केवळ २९ जागाच मिळाल्या होत्या. मात्र, काही वेळातच हा नंबर घटून २७ वर आला होता. या दोन्ही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर झालेल्या पोट निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. याशिवाय, आणखीही काही आमदार काँग्रेस सोडून भाजप किंवा भाजपचा सहकाही पक्ष असलेल्या आसाम गण परिषदमध्ये जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी म्हटले होते की, आता काही मुस्लीम आमदारच काँग्रेसमध्ये शिल्लक राहतील.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा