Ayodhya Ram mandir : राम मंदिराचा प्रसाद वाटण्यासाठी ट्रस्टने कैद्यांना दिली पिशव्यांची मोठी ऑर्डर!

ही ऑर्डर कैद्यांना कशी मिळाली?


अयोध्या : अयोध्येतील भव्य अशा राम मंदिरात (Ayodhya Ram mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ramlalla Pranpratishtha) झाल्यापासून अनेक रामभक्तांनी अयोध्येत गर्दी करायला सुरुवात केली. लाखो भाविक रोज रामलल्लाचे दर्शन घेत असतात. राम मंदिरासाठी आपणही काहीतरी करावं असं प्रत्येक रामभक्ताला वाटतं. त्यामुळेच कोणी देणगीच्या स्वरुपात, तर कोणी भेटवस्तूच्या स्वरुपात ही सेवा करत आहे. याच प्रकारे काही कैद्यांनी (Prisoners) राम मंदिर ट्रस्टसाठी काही पिशव्या स्वतः बनवून त्या भेट म्हणून पाठवल्या होत्या. या पिशव्या ट्रस्टमधील सर्वांना इतक्या आवडल्या की त्यांनी कैद्यांना आणखी ५ हजार पिशव्या बनवण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे, या पिशवीतून रामभक्तांना प्रसाद देण्यात येणार आहे.


फतेहपूर येथील तुरुंगात कैद्यांनी स्वहस्ते बनवलेल्या ११०० पिशव्या राम मंदिराला अर्पण करण्यात आल्या. या पिशव्यांचा रंग केशरी असून, यावर श्रीरामांसह राम मंदिराची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे. या पिशव्या ट्रस्टला प्राप्त झाल्यानंतर सर्वजण अवाक् झाले. या पिशव्या सर्वांनाच आवडल्या. यानंतर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तुरुंगातील कैद्यांना आणखी पिशव्या बनवण्याची विनंती केली. या पिशव्या प्रसाद वाटपासाठी वापरल्या जाणार आहेत.


या पिशव्या तयार करण्यासाठी सर्व धर्माच्या कैद्यांचा सहभाग होता. पॉलिथीन मुक्त भारत मोहिमेअंतर्गत तुरुंगातील कैद्यांनी या पिशव्या स्वतः तयार केल्या आहेत. मात्र, यामध्ये किरकोळ सुधारणा करण्यास सांगण्यात येणार असून, आकार वाढवला जाणार आहे. तशा प्रकारचे मागणी पत्र राम मंदिर ट्रस्टकडून पाठवण्यात आले आहे.



कैद्याने आपल्या श्रमाची रक्कम अर्पण केली रामचरणी


दरम्यान, याच फतेहपूर तुरुंगात असलेल्या झियाउल हसन या कैद्याने रामचरणी आपल्या श्रमाचे पैसे दान केले आहेत. या कैद्याने १०७५ रुपयांची रक्कम रामलल्लाचरणी अर्पण केली. या कैद्याने तुरुंगात स्वच्छता करण्याच्या मजुरीतून मिळणारी दीड महिन्याची कमाई रामलल्ला यांना समर्पित केली. त्याच्या विनंतीवरून कारागृह अधीक्षकांनी १०७५ रुपयांचा धनादेश अयोध्येला पाठवून दिला. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला हा धनादेश प्राप्त झाला आणि खात्यात जमा करण्यात आला.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा