Rajiv kumar Shayri : झूठ के बाजार में रौनक तो बहुत है... काय म्हणाले राजीव कुमार?

फेक न्यूज पसरवणार्‍यांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिला संदेश


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर करण्यात आल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांनी याबाबत सर्व माहिती दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजीव कुमार यांनी सादर केलेली शायरी (Shayri).


आजकाल सोशल मीडियावर (Social Media) पसरणार्‍या फेक न्यूजमुळे (Fake News) समाजात असंतोष निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा पत्रकारांकडून देखील पूर्णपणे खात्री करुन न घेता थेट बातमी दिली जाते. त्यामुळे लोक देखील याबाबत शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतात आणि चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. यावर भाष्य करताना राजीव कुमार यांनी एक शायरी सादर केली.



राजीव कुमार म्हणाले, "सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्हा सर्वांना एक आवाहन आहे की, एकदा खात्री करुन घ्या. म्हणजे जी काही बातमी येते ती लगेच फॉरवर्ड करता कामा नये. हा एक खूप मोठा खोट्याचा बाजार आहे. मी याबाबत विचार करत असताना काही ओळी मला सुचल्या त्या ऐकवतो -
झूठ के बाजार में रौनक तो बहुत है
गोया बुलबुले जैसी तुरन्त ही फट जाती है
तुम्ही बुलबुला पकडायला गेलात तरी तुम्हाला यात धोकाच आहे, असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे एखादी माहिती पुढे पाठवायची की नाही यावर विचार करा', असा संदेश त्यांनी दिला.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी