आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईला

नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामाची अंतिम लढत २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी आयपीएलच्या संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बोर्डाने उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.


आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून दणक्यात सुरुवात झाली. देशात लोकसभा निवडणुका होत असल्यामुळे आयपीएलच्या पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले होते. २१ सामन्यांचे ७ एप्रिलपर्यंतचे हे वेळापत्रक होते. निवडणुकांच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले होते. सोमवारी बीसीसीआयने उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार आयपीएलची यंदाच्या हंगामाची फायनल २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणार आहेत.


सोमवारी बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ८ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याने पुढच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. २६ मे २०२४ रोजी आयपीएलच्या १७व्या हंगामाची अंतिम लढत होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर आयपीएलची फायनल चेन्नईत होणार आहे.


क्वालिफायर १ आणि एलिमेटनर हे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनुक्रमे २१ मे आणि २२ मे रोजी होणार आहेत. तर क्वालिफायर दोन हा सामना २४ मे रोजी चेन्नईला होणार आहे.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?