PPF: ५ एप्रिलपूर्वी पूर्ण करा 'हे' काम; अन्यथा होईल लाखोंचे नुकसान!

मुंबई : नवे आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी आर्थिक आणि कर नियोजन करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी सार्वजनिक भविष्य निधि म्हणजेच पीपीएफकडे अजूनही सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. या योजनेमुळे करबचतीसह उच्च व्याजदर देखील मिळते. तुम्ही पीपीएफमध्ये (PPF) गुंतवणूक करत असाल, तर ५ एप्रिल ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. अन्यथा ही तारीख चुकल्यास खातेदारांचे लाखोंचे नुकसान कसे होऊ शकते ते जाणून घेऊयात.


जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ५ एप्रिलपर्यंत पीपीएफमध्ये योजनेत एकरकमी पैसे गुंतवले, तर तुम्हाला सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळेल. या खात्यात, दर महिन्याच्या ५ तारखेला व्याज मोजले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या ५ एप्रिलपर्यंत एकरकमी रक्कम जमा केली, तर तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी व्याजाचा लाभ मिळेल.


पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकार ७.१ टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे. जर एखाद्या व्यक्तीने प्रत्येक महिन्याच्या योग्य तारखेपर्यंत गुंतवणूक केल्यास त्याला जमा केलेल्या रकमेवर पूर्ण व्याजाचा लाभ मिळतो. अन्यथा तारीख चुकल्यास, ५ तारखेनंतर गुंतवणूक केली तर सर्वात कमी शिल्लक रकमेवरच व्याजाचा लाभ मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला त्या महिन्यात व्याजाचे नुकसान होऊ शकते.


पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या आर्थिक वर्षात ५ एप्रिलपर्यंत एकरकमी १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करुन ती १५ वर्षे सुरू ठेवली, तर तुम्हाला १५ वर्षांत जमा केलेल्या रकमेवर एकूण १८.१८ लाख रुपये व्याज म्हणून मिळतील. जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेनंतर पीपीएफमध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला फक्त १७.९५ लाख रुपये व्याज मिळेल. अशा स्थितीत, तुम्हाला १५ वर्षांत २३,१८८ रुपयांचे व्याजाचे नुकसान होऊ शकते.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि