लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये३३, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये ३०, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.


या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.


'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी,कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.


जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद २०, बीड ६, भंडारा ७, बुलढाणा १४, चंद्रपूर६, धुळे ५, गोदिंया ४, हिंगोली ६, जालना ५, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १०, नागपूर १२, नांदेड २०, नंदुरबार ४, उस्मानाबाद १६, पालघर ६, परभणी ४, पुणे २१, रायगड ७, सांगली ८, सातारा १६, सोलापूर २२, वर्धा ८ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.

Comments
Add Comment

Sand Mining Maharashtra : वाळू लिलाव धोरणात राज्य सरकारकडून बदल

- ई-लिलावासोबत ई-निविदा पद्धत बंधनकारक; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केल्या नवीन मार्गदर्शक

Pune Traffic Update: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गणेशोत्सवात ३ दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

पुणे: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत तीन दिवसांसाठी

Jalgaon Ganeshotsav : स्थापनेआधीच बाप्पाचं विसर्जन! ४७ हजारांची १२ फुटी गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; कार्यकर्त्यांचा मूर्तिकारावर आरोप

जळगाव : गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात बऱ्हाणपूरहून जळगावकडे आणली जात असलेली तब्बल १२ फूट उंचीची गणेशमूर्ती

Manoj Jarange Patil : १९ सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार - आझाद मैदानात आंदोलन; १५ सप्टेंबरला अंतरवालीहून प्रस्थान करणार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक देण्याची

Maharashtra School Recruitment : अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा

- राज्य शासनाकडून आदेश जारी; मुलाखतीचे इन-कॅमेरे चित्रिकरण बंधनकारक मुंबई : राज्यातील अनुदानित माध्यमिक आणि उच्च

Mira Road School : विद्यार्थ्यांवर खानपान सक्ती लादणाऱ्या मीरारोडमधील शाळेला दणका

- शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस; पर्युषण काळात डब्यात कांदा, लसूण, बीट न आणण्याच्या सूचना मुंबई : पर्युषण