मुंबई: 'मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं' ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल किंवा त्या म्हणीचा कोणाला बोलण्यासाठी सुद्धा केला असेल. पण मुंबईमध्ये ही म्हण एका ...
पुणे वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना पर्यायी मार्ग आणि पार्किंगच्या व्यवस्थेबाबतची सर्व माहिती दिली आहे. शिवाय, नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर, सिंहगड रोडवरील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या मार्गावर वाहन पार्किंगला मनाई करण्यात आली आहे.
मुंबई : 'हनुमान अंश'चे बॉक्स ऑफिसवरील वर्चस्व कायम आहे. या चित्रपटाचा दबदबा असतानाच, अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला 'हैवान' हा नवीन ...
वाहन चालकांनी संताजी घोरपडे रोड, कुंभारवेस चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक मार्गावरून पुढे इच्छित स्थळी जाता येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांना छत्रपती शिवाजी पुलावरुन डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गे कुंभारवेसच्या दिशेने पुढे इच्छित स्थळी जाता येणार आहे. सारसबाग परिसरातील स्वातंत्रवीर सावरकर पुतळा चौक ते समाधना भेळ केंद्र परिसराला 'नो पार्किंग' परिसर म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालकांना मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा आणि नीलायम थिएटरजवळ पार्किंग करावी लागणार असल्याची माहिती, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे.
नवी दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे ...
गणेश चतुर्थीच्या दिवशी, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, आप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक, मंगला थिएटर्ससमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पुणेकर गणेशमुर्ती खरेदी करण्यासाठी येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहे. शिवाजीनगर बस स्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगर बस स्थानकातून स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक रोडवरून पीएमपी बस स्वारगेटकडे जाईल. तर, महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज मार्गे जाणार आहे.