Mira Road School : विद्यार्थ्यांवर खानपान सक्ती लादणाऱ्या मीरारोडमधील शाळेला दणका

- शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस; पर्युषण काळात डब्यात कांदा, लसूण, बीट न आणण्याच्या सूचना


मुंबई : पर्युषण काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट आदी पदार्थ आणू नयेत, अशा सूचना पालकांना केल्याप्रकरणी मीरारोड पूर्वेकडील सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेला ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर धार्मिक कारणांवरून निर्बंध घालणे आणि त्यातून विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव निर्माण होणे, हे बालकांच्या हक्कांशी संबंधित तरतुदींशी विसंगत ठरू शकते, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. (Mira Road School)



ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी ही नोटीस बजावली असून, शाळेला दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेचा खुलासा समाधानकारक न आढळल्यास शालेय संहिता तसेच बालकांच्या हक्कांशी संबंधित कायद्यांनुसार कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे. (Mira Road School)


मिरा रोड पूर्वेकडील सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पर्युषण काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे पदार्थ आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले होते. शाळा प्रशासनाकडून पालकांच्या मोबाईलवर हे संदेश पाठविण्यात आले होते. जैन धर्मात पर्युषण काळाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळेकडून विद्यार्थ्यांनी संबंधित पदार्थ खाऊ नयेत किंवा ते डब्यात आणू नयेत, अशी सूचना करण्यात आली होती. या सूचनेनंतर पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही शाळेच्या भूमिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पालक तसेच मनसेकडून आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली आणि शाळेच्या भूमिकेवर राज्यभरातून टीका होऊ लागली. त्यानंतर ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने प्रकरणाची दखल घेत शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली. (Mira Road School)



विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सवयींबाबत धार्मिक कारणांवरून निर्बंध घालणे आणि त्यातून त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण होणे हा गंभीर मुद्दा असल्याचे शिक्षण विभागाने नोटिशीत नमूद केले आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून या नोटिशीला काय उत्तर दिले जाते आणि त्या खुलाशाच्या आधारे शिक्षण विभाग पुढे कोणती कारवाई करतो, याकडे आता लक्ष लागले आहे. (Mira Road School)

Comments
Add Comment

Manoj Jarange Patil : १९ सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार - आझाद मैदानात आंदोलन; १५ सप्टेंबरला अंतरवालीहून प्रस्थान करणार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक देण्याची

Maharashtra School Recruitment : अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा

- राज्य शासनाकडून आदेश जारी; मुलाखतीचे इन-कॅमेरे चित्रिकरण बंधनकारक मुंबई : राज्यातील अनुदानित माध्यमिक आणि उच्च

Pm Modi Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील १० हजार बूथवर दिवे प्रज्वलित करणार

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी मुंबईतील १० हजार बूथवर दिवे प्रज्वलित

Yavatmal Accident : अंगावर काटा आणणारी घटना ! यात्रेत महिला आकाश पाळण्यात बसली, केस बेरिंगमध्ये अडकले अन् डोक्याची चामडीच...

Yavatmal Accident : यात्रा म्हटली की पाळणे आलेच. अनेकांना या रंगेबेरंगी, मोठमोठ्या पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही पण याच

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आता राज्यातील हवामानात

Madhuri Elephant News : माधुरी हत्तीणीची अखेर घरवापसी; 48 तासांचा प्रवास करून नांदणीत दाखल, कोल्हापूरकरांनी उधळला गुलाल

कोल्हापूर : “आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या” अशी मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण अखेर