उरणमध्ये कारच्या धडकेत स्कुटीवरील दाम्पत्याचा मृत्यू

अपघातात गंभीर जखमी झालेली 3 वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक


नवी मुंबई(प्रतिनिधी): बोकडविरा गावाकडून उरणच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव क्रेटा कारने समोरुन येणाऱ्या स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरील दाम्पत्याचा मृत्यू तर त्यांची 3 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री उरण रेल्वे स्टेशनजवळ घडली. या अपघातानंतर क्रेटा कार चालक पळून गेला असून उरण पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.


या अपघातात मृत झालेल्या दाम्पत्याचे नाव पवित्र मोहन बराल (४०) व रश्मिता पवित्र बराल (३७) असे आहे. या अपघातातील मृत बराल दाम्पत्य उरण मधील बोरी पाखाडी भागात मागील अनेक वर्षापासून राहण्यास होते. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास बराल दाम्पत्य आपल्या ३ वर्षीय मुलगी परी सोबत स्कुटीवरुन उरणकडुन बोकडविराकडे कामानिमित्त जात होते. यावेळी त्यांची स्कुटी उरण रेल्वे स्टेशन जवळ आली असताना बोकडविराकडुन उरणच्या दिशेने जाणाऱया भरधाव क्रेटा कार चालकाने त्यांच्या स्कुटीला समोरुन जोरात धडक दिली.


ही धडक इतकी जबरदस्त होती, की त्यामुळे स्कुटीचे दोन तुकडे होऊन स्कुटीवरील बराल दाम्पत्यासह त्यांची तीन वर्षाची मुलगी दूरवर फेकले गेले. या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पवित्र व त्यांची पत्नी स्मिता या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बराल दाम्पत्याची ३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला बेलापूर येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


या अपघातातील क्रेटा कारचा चालक जय चंद्रहास घरत याने आपल्या हातून अपघात घडल्या नंतरही रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या तिघांना मदत तर केली नाहीच उलट त्याने रेल्वेच्या आरपीएफ जवाना सोबत हुज्जत घातली. तसेच त्यांच्या वर्दीची कॉलर पकडून शिवीगाळ करीत मारहाण केली आहे. यानंतर घटनास्थळावरुन पलायन केले. याप्रकरणी आर पी एफ चें जवान अतुल चौहान यांनी उरण पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी आरोपी जय चंद्रहास घरत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपी कार चालक हा नशेत असल्याने हा अपघात घडला असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC Ganesh Gaurav Award : अंधेरीतील स्वप्नाक्षय मित्र मंडळ पुन्हा एकदा अव्वल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२६’मध्ये

Mumbai Voter List 2026 : नवमतदार नोंदणी आणि मतदार यादीतील नोंदीत दुरुस्तीसाठी २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मुंबईत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एस

Lalbaugcha Raja 2026 : बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली! लालबागच्या राजाचे चरणस्पर्श आणि मुख दर्शन बंद होणार, जाणून घ्या सविस्तर वेळ

मुंबई: मुंबईचा राजा आणि जगभरातील लाडक्या लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर

Ganpati Special Train : गणेश भक्तांसाठी खूशखबर! मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी 4 विशेष गाड्या जाहीर, विशेष गाड्यांची एकूण संख्या 394 वर

मुंबई: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.

FDA Raids : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; निकृष्ट अन्नपदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आणि कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त

मुंबई: महाराष्ट्रात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या व्यावसायिक व

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या मिरवणुकीत डीजे-फटाके वाजवणार असाल तर सावधान.. हायकोर्टाच्या 'या' १३ नियमांनी उडाली खळबळ

मुंबई: महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. मात्र, याच उत्सवाच्या