Narayan Rane : कोकणात येऊन बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान



रत्नागिरी : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी प्रचारासाठी सभांचा धडाका लावला आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. 'सिंधुदुर्ग दौऱ्यात आल्यानंतर अशा प्रकारचे शब्द बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी दाखवतो', असं नारायण राणे म्हणाले आहेत.



नारायण राणे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी पक्ष काही वर्षात संपवला. ते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कोणत्या भाषेत बोलत आहेत. पण आता मी खासदारकी लढवत आहे. ते इकडे कोकणात येतील, या आणि असे शब्द सिंधुदुर्गमध्ये बोलून दाखवा. मग परत जायचा रस्ता कुठून आहे ते आम्ही दाखवतो. हे चालणार नाही”, असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.



पुढे ते म्हणाले, "उद्धव ठाकरे म्हणजे लाज सोडलेला कोडगा व अक्कलशून्य माणूस आहे. माननीय अमितजी शहा मातोश्रीवर जाऊन ५ वर्षे झाली तरीही त्यावेळेच्या घटनेबद्दल लोकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत. अमितजी शहा यांनी उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव मान्य केलाच नव्हता. त्यांनी अनेक वेळा भाजपाने शिवसेनेला अडीच वर्षांची मान्यता दिलीच नव्हती हा खुलासा केला आहे.



मुख्यमंत्रीपदी असूनही महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीच करू न शकलेला असा अपयशी आणि महाराष्ट्राला मागे नेणारा हा मुख्यमंत्री होता. तोच तोच चुकांचा जुना इतिहास सांगून अभद्र अपशब्द वापरणारा लाजलज्जा सोडलेला हा माणूस कोडगा आहे. सत्ता गेल्याने व डोळ्यासमोरून ४० आमदार शिवसेना सोडून गेल्यामुळे हा माणूस अपयशाने व भविष्याच्या चिंतेने वैफल्यग्रस्त झाला आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बदल कोणताही अपशब्द उच्चारल्यास तुम्हाला कोणीही चांगले म्हणणारच नाही. जनतेसाठी करण्यासारखे काही नसल्याने वेडसरपणे ते टीका करीत आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरविला. या करंट्या माणसाने साहेबांच्या नंतर काही वर्षांतच शिवसेना पक्ष संपविला", असा घणाघात नारायण राणे यांनी केला.


Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा