Robot Wedding : अजब गजब! तरुण चक्क रोबोटसोबत बांधणार लग्नगाठ

जाणून घ्या नक्की प्रकरण काय?


जयपूर : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱ्हाडी मंडळी आलीच. आतापर्यंत आपण दोन सजीव व्यक्तींमध्ये लग्न होत आल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र राजस्थानमधील एक व्यक्ती चक्क रोबोटसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची अजब गजब माहिती उघडकीस आली आहे. राजस्थानमध्ये जयपूर येते राहणारा इंजिनियर सूर्य प्रकाश समोटा हे एका रोबोटशी लग्न करणार आहेत. रोबोट्सची आवड असलेल्या सूर्य प्रकाश आता रोबोटच्या प्रेमात पडले असून, ते आता 'गीगा' या नावाच्या रोबोटसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.


सूर्य प्रकाश यांचे मन रोबोटमध्ये गुंतलं होतं. कुटुंबाने त्याची रोबोट्सची आवड पाहून आयटी क्षेत्रात जाण्याची परवानगी दिली. यानंतर सूर्य प्रकाश यांनी अजमेरच्या शासकीय महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते रोबोटिक्समध्ये रुजू झाले. या काळात त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केलं. तर आता ते एका रोबोटसोबत सर्व विधी, परंपरेनुसार लग्न करणार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यही त्यात सहभागी होणार आहेत, असे सूर्य प्रकाश यांनी सांगितले.



रोबोट तयार करायला १९ लाख रुपये खर्च


एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 'गीगा' हा रोबोट तयार करण्यासाठी सुमारे १९ लाख रुपये खर्च आला. अशा प्रकारचं लग्न करण्यास कुटुंबियांचा नकार होता. पण, आता त्यांना मी तयार केलं आहे. या रोबोटची निर्मिती तामिळनाडूमध्ये केली जात आहे, तर त्याचे प्रोग्रामिंग दिल्लीत केले जात आहे. 'लहानपणापासून मला रोबोट्समध्ये खूप रस होता. मात्र, मी सैन्यात भरती व्हावं असं माझ्या कुटुंबियांना वाटत होतं. त्यानंतर मी सैन्यात भरती होण्याची तयारी केली आणि नौदलातही निवड झाली'असे सूर्य प्रकाश यांनी सांगितले.



रोबोट करणार 'ही' कामं


सूर्य प्रकाश यांनी सांगितलं की, "जेव्हा हा सर्व प्रकार मी आपल्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना धक्काच बसला, पण नंतर घरच्यांना समजावलं. 'गीगा'च्या संपूर्ण प्रोग्रामिंगसाठी सुमारे ५ लाख रुपये खर्च येणार असून, हा प्रोग्रामिंग इंग्रजीमध्ये असणार आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा हिंदी प्रोग्रामिंग देखील जोडलं जाऊ शकतं. तसेच, 'गीगा' आठ तास काम करू शकते, ज्यामध्ये पाणी आणणे, हॅलो म्हणणे, पाहुण्यांचे स्वागत करणे यासारखी कामं तो रोबोट करणार आहे."


दरम्यान, सूर्य प्रकाश यांनी सुमारे चारशे रोबोटिक्स प्रकल्पांवर काम केले आहे. कोरोनाच्या काळात जयपूरच्या सवाईमान सिंह रुग्णालयात रोबोटच्या माध्यमातून रुग्णांना औषधे आणि अन्न दिलं जात होतं. याशिवाय त्यांनी कोरोनाच्या काळात टचलेस मतदान यंत्राचं मॉडेलही तयार केलं होतं. आता सूर्य प्रकाश हे इस्रायली सैन्यासोबत काम करणार आहेत आणि लवकरच ते इस्रायलला रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि