ग्रामपंचायत गैरव्यवहाराबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार - संजय जांभळे

पेण : पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोलवी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत प्रशासकीय अधिकारी हे ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. डोलवी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत पुरावे देऊनही प्रशासकीय अधिकारी चालढकल करीत असून त्याबाबत वस्तुस्थिती मांडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.


डोलवी ग्रामपंचायत गैरव्यवहार विषय हाती घेऊन माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत तपासणी झाल्यानंतर गटविकास अधिका-यांकडे अहवाल मागविण्यात आला होता. त्यांनी अहवाल पाठविल्यानंतर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर बराच काळ निघून गेला. त्यामुळे पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी पुन्हा २०१४ च्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट एक मधील परिच्छेद दोन नुसार नियमाप्रमाणे आपल्या स्तरावर कारवाई करावी, असा आदेश २६ सप्टेंबर २०२३ रोजी पत्राद्वारे काढला. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु सौम्य कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. हा दिखावा नको तर भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. एखाद्या सामान्य ग्रामपंचायत मध्ये ३९/१ ची कारवाई त्वरीत करण्यात येते. परंतु डोलवी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही कारवाई का केली जात नाही? चौकशीच्या नावाने वेळकाढूपणा काढला जात आहे हे खपवुन घेतले जाणार नाही, असेही जांभळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


तसेच गटविकास अधिकारी कारवाई करण्यास दिरंगाई कोणाच्या दबावाखाली करत आहेत? गटविकास अधिकारी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा विसर पडलाय आहे का? असा सवाल जांभळे यांनी विचारला आहे. जो गुन्हा झाला आहे हे पुराव्यात दिसून येत आहे. याबाबत आयुक्त, मुख्य कार्यकारी, गट विकास अधिकारी यांनी चालढकल केल्याने त्यांच्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशाराही जांभळे यांनी यावेळी दिला.


यासंदर्भात पेणचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांना अनेकदा संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Comments
Add Comment

Nashik News : येवल्यात 760 कोटींचा मेगा प्रोजेक्ट ! 4 हजार रोजगारांची संधी

Nashik News : नाशिकच्या येवल्यात आता उद्योगविश्वासाठी मोठी बातमी आहे. कारण येवल्यात तब्बल ७६० कोटी रुपयांचा कृषी-आधारित

Vandana Gupte News: वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या; म्हणाल्या, 'खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी...'

मुंबई: प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री वंदना गुप्ते ह्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चहात्यांच्या

AI Photo Trend: इन्स्टाग्रामवर 80s AI फोटो ट्रेंड व्हायरल; जुन्या काळातील लूकमध्ये स्वतःला पाहण्याची क्रेझ

मुंबई : सोशल मीडियावर सध्या 1980 च्या दशकाची नॉस्टॅल्जिया पुन्हा पाहायला मिळत आहे. Instagram वर AI च्या मदतीने स्वतःचे फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला बाप्पाची मूर्ती घरी आणण्यापूर्वी ‘हे’ नक्की तपासा; दुर्लक्ष केल्यास ऐनवेळी होईल मोठा गोंधळ

Ganesh Chaturthi 2026 : गणेशभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो दिवस आता जवळ आला आहे. गणेश चतुर्थीपासून घरोघरी गणपती

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

FDA News: मुंबईमध्ये एफडीएची धडक कारवाई, रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाकडून IRCTC अंतर्गत रेल्वे प्रवाशांना अन्न पुरवठा करणाऱ्या बेस किचन आणि फूड प्लाझाची